पांचट Jokes: पिंटूचा प्रश्नांचा भडीमार पण चिंटूचे त्यांना सडेतोड उत्तर; दोन मित्रांमधील हे संभाषण वाचाल तर हास्याने लोटपोट व्हाल
Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! चिंटू मिंटूसारखे नाते आपलेही कोणा ना कोणासोबत असतेच! मैत्रीचे हे नाते अनेक खट्याळ आणि मिश्किल विनोदांना जन्म देत असते. थोडा वेळ काढून हास्याने भरलेले जोक्स एकदा वाचा जरूर.
चिंटू : स्टेशनवर जाण्यासाठी तुम्ही किती पैसे घ्याल?
रिक्षावाला : ५०रुपये
चिंटू : २० रुपये घ्या
रिक्षावाला : २० रुपयांमध्ये कोण घेऊन जाईल?
चिंटू – तुम्ही मागे बसा, मी घेऊन जातो…
चिंटू : मम्मी, सगळी खेळणी लवकर लपव
मम्मी : का?
चिंटू : माझा मित्र पिंटू येत आहे.
मम्मी : मग पिंटू खेळणी चोरतो का?
चिंटू : नाही गं, तो त्याची खेळणी ओळखेल
चिंटूला त्याची आई बेदम मारते. पोट भर मार खाउन चिंटू बाहेर येतो आणी वडलांना विचारतो : बाबा तूम्ही पाकीस्ताना गेला होता काय?
बाबा म्हणतात : नाही बाळ मी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलो नाही, पण तू हे का विचारलेस?
चिंटू म्हणाला : पाकीस्तान गेलात नाही म्हणता मग घरात हा खतरनाक आतंकवादी तुम्ही आणलात कुठून?
चिंटू : भावा, मी अशी वस्तू बनवली आहे ज्याच्या मदतीने आपण काहीही आरपार पाहू शकतो?
पिंटू : व्वा, अशी कोणती वस्तू बनवलीस?
चिंटू : खिडकी
चिंटूच्या त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचं लग्न ठरलं, चिंटूला लग्नपत्रिका मिळाली
मिंटू : भावा, तुला वाईट वाटत असेल
चिंटू : हो मित्रा, मला वाईट वाटत आहे
मिंटू : लग्नाला जाणार आहेस?
चिंटू : हो मग, हे बघ भावा प्रेम एकीकडे आणि लग्नाचं जेवण एकीकडे
चिंटू : काय झालं, उदास का बसला आहेस?
मिंटू : काल एका न्यूज चॅनेलचा अँकर म्हणाला… चला आम्ही तुम्हाला गोव्याची सफर करवतो. मी तेव्हापासून वाट पाहत आहे, पण अजून कुणीच आलं नाही
चिंटू : माझी बायको खूप चांगली आहे, या थंडीत ती माझ्यासाठी पाणी गरम करते
पिंटू : आंघोळीसाठी?
चिंटू : नाही, नाही, भांडी धुण्यासाठी…