Panchat Jokes The Patient Irritate Doctor With His Strange Questions Read These Jokes And Laugh Out Loud
पांचट Jokes: रुग्णाला नको ते प्रश्न विचारून डॉक्टरांनी आपल्याच पायावर धोंडा मारला… हास्याने लोटपोट होण्यासाठी वाचा जरूर
Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! डॉक्टर कितीही शहाणा असला तरी कधी ना कधी अतिशहाणा रुग्ण हा भेटतोच आणि मग जे घडते ते हास्यास्पद ठरते. डॉक्टर-रुग्णातील हे खट्याळ संभाषण नक्कीच तुम्हाला पोट धरून हसवेल.
डॉक्टर : तुमची तब्येत कशी आहे?
रुग्ण : आता पूर्वीपेक्षा जास्त वाईट आहे…
डॉक्टर : तुम्ही औषध घेतले का?
रुग्ण : हो, मी ते तुमच्याकडूनच तर घेतले…
डॉक्टर : तू औषध खाल्ले का?
रुग्ण : नाही डॉक्टर, ते तर बाटलीत होते ते खाणार कसं?
डॉक्टर : अरे मूर्ख..!! तू औषध प्यायले का..?
रुग्ण : नाही, तुम्हीच मला ते फ्रीजमध्ये ठेवण्यास सांगितले होते…
डॉक्टर : अरे काय मार खाणार का?
रुग्ण : नाही, मी औषध घेईन…
डॉक्टर : बाहेर जा भाऊ, तू मला वेडा करशील…
रुग्ण : मी जात आहे, पण मी कधी परत येऊ?
डॉक्टर : तू जा आणि परत कधीच येऊ नकोस… नाय तर मला मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येईल
डॉक्टर : कसे आहात? तुम्ही दारू पिणे बंद केले आहे की नाही?
रुग्ण : हो, डॉक्टर साहेब, मी पूर्णपणे दारू पिणे बंद केले आहे. जेव्हा कोणी मला खूप विनंती करते तेव्हाच मी पितो
डॉक्टर : खूप छान… आणि तुमच्यासोबत हे भाऊ कोण आहेत?
रुग्ण : हो, मी त्याला विनंती करण्यासाठी ठेवले आहे
रुग्ण: माझे आयुष्य वाढवण्याचा काही मार्ग सांगा
डॉक्टर: लग्न करा
रुग्ण: यामुळे माझे आयुष्य वाढेल का?
डॉक्टर: नाही, पण निश्चितच दोन फायदे होतील. पहिले, दीर्घ आयुष्याची इच्छा संपेल आणि दुसरे, उर्वरित आयुष्य मोठे वाटू लागेल
डॉक्टर : घाबरू नकोस देशपांडे… ऑपरेशन लहानच आहे
रुग्ण : थँक यु डॉक्टर, पण माझं नाव देशपांडे नाही आहे
डॉक्टर : मला माहिती आहे… देशपांडे तर माझं नाव आहे
दीर्घ आजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात.
डॉक्टर : आधी कोणत्या डॉक्टरकडे गेला होतात ?
अण्णा : डॉ. देशपांडे
डॉक्टर : अहो तो देशपांडे डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतो. तुम्हाला कोणता सल्ला दिला ?
अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा…
डॉक्टर : पेशंटला जरी एक तास अगोदर आणलं असतं तरी आम्ही त्याला वाचवू शकलो असतो.
पप्पू : अबे, 10 मिनिटांपूर्वी तर ॲक्सिडंट झालाय. एक तास अगोदर काय जबरदस्ती ठोकून आणायला हवं होत
पेशंट: विचित्र आजार झालाय.. जेवणानंतर भूक लागत नाही.. सकाळी उठल्यावर झोप लागत नाही.. काम केल्यावर थकवा येतो.. काय करू..?
डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा..!
ऑपरेशन टेबलावर पडलेल्या रुग्णाने डॉक्टरांना विचारले : डॉक्टर साहेब, मला किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल?
डॉक्टर : जर ऑपरेशन यशस्वी झाले तर एक आठवडा, नाहीतर अर्धा तास
डॉक्टर (बेशुद्ध रुग्णाला पाहून) : हा मेला आहे
रुग्ण (शुद्धी परत येत आहे) : मी जिवंत आहे
रुग्णाची पत्नी (रुग्णाच्या पतीला) : बोलण्यापूर्वी काहीतरी विचार करा, हे इतके मोठे डॉक्टर खोटं बोलतील का?
रुग्ण: मला काय झाले?
डॉक्टर: तुम्हाला सोनोग्राफी करावी लागेल
रुग्ण: साहेब, मी एक गरीब माणूस आहे, तुम्ही चांदिग्राफी किंवा कॉपरग्राफीने काम चालवून घ्या
Web Title: Panchat jokes the patient irritate doctor with his strange questions read these jokes and laugh out loud