पांचट Jokes: पाहुणे की इज्जतीचा पंचनामा? वाचलंत तर हसून हसून पोट दुखेल
Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! पाहुणे येणार म्हटलं की घरच्यांच्या कपाळी आठ्या येणार हे नक्की! टोमण्यांच्या रूपात पाहुण्यांसोबत होणार हे संभाषण अनेकदा हसू आणते. पाहुण्यांचे हे मराठी जोक्स नक्कीच चेहऱ्यावर हसू आणेल.
पाहुणा : बेटा, तुझ्या वडिलांची नक्कल करून दाखव…
मुलगा : जमिनीवर पडून रडतो आणि म्हणतो, बायको मला जरा एकटं सोड, देवासाठी तरी मला सोड
पाहुणे : बेटा, तू काय करतोस?
मुलगा: मी नारी सन्मान सेवेसाठी काम करतो
काका: तू समाजसेवक आहेस का?
मुलगा: नाही काका, मी फेसबुकवरील सर्व मुलींचे फोटो लाइक करतो.
मुलगा : आई, पाहुण्यांना चहासोबत ताटात चार बिस्किटेच दे
आई : का बरं असं?
मुलगा : खाणाऱ्याला वाटेल की आपण बिस्कीट घेतलं तर बिस्कीट कमी होतील मग कोणीच बिस्कीट खाणार नाही
पुणेरी लग्न…
एक पाहुणा दुसऱ्या पाहुण्याला
पहिला पाहुणा : हे काय, त्यांनी जेवण काउंटरवर डिजिटल सेवा सुरु केली आहे
दुसरा पाहुणा : हो, बरोबर आहे. तुम्ही जेव्हा गिफ्ट द्याल त्याबरोबर तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी मिळेल
तो ओटीपी तुम्ही जेवण काऊंटरवर दाखविला तरंच तुम्हाला जेवण मिळेल
पाहुणा : मला तुमच्या घरातील माशा फार त्रास देतात. मी आलो तेव्हापासून त्या माझ्या अंगावर बसतायेत
मुलगा : काका, मी पण त्यांच्या या सवयीने अगदी त्रासलोय. कुठे एखादी घाणेरडी वस्तू पाहिली की लगेच त्या बसतात
नवरा : अगं, ऐकलंस का? घरी पाहुणे आलेत ना! त्यांना जेवणाचे विचार जरा!
बायको : भावजी, तुम्ही घरून जेवून आलात की घरी जाऊन जेवणार?
पाहुणा : नाही मी इथेच जेवणार
बायको : डबा घेऊन आलाय का?
पाहुणा : हो, भरूनच घेऊन जाणार आहे
घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना मुलगा मोठ्याने म्हणाला
आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत…
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत,
त्यांच काय झाल ?
Web Title: Panchat jokes guest came but at what cost read funny marathi jokes and laugh out louder