Panchat Jokes Son Asks His Mother Why Gandhi Ji Had No Hair On Their Head Funny Son And Mother Jokes Will Make You Laugh Out Loud
पांचट Jokes: मुलगा… आई, गांधीजींच्या डोक्यावर केस का नव्हते? उत्तर ऐकाल हसून हसून वेडे व्हाल
Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! आई मुलाचे नाते हे फक्त प्रेम-जिव्हाळ्याने नाही तर खट्याळ मस्करीनेही भरलेले असते. आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढा आणि आई मुलाचे हे मिश्किल संभाषण वाचा जरूर.
आई – बेटा कुठे आहेस तू ? रात्रीचे 1 वाजले, लवकर घर ये बेटा
मुलगा – कोण बोलतंय?
आई – अरे ये मुडद्या, मेल्या, कुठ हाईस र तू ? ईवढी रात झाली कूट मरायला गेलाईस ? यवढ्या राती गावांभर हिँडत बसतो लवकर ये घराकड
मुलगा – अग आय तू हाईस का? यवढ्या इज़्ज़तीन बोलत होती मला वाटल बापान दुसर लगीन केल की काय, थांब आलुच….!
मुलगा : आई, काकुच्या मुलीच नाव जस्मीन का आहे?
आई : कारण काकुला ते फुल आवडत
मुलगा : आई, मग माझ नाव अस का?
आई : गोट्या, फालतू प्रश्न विचारू नको..
आई : सोफा लेटण्यासाठी नाही तर बसण्यासाठी असतो
मुलगा : हा तर मग चप्पल पण मारण्यासाठी नाही तर पायात घालण्यासाठी असते
मुलगा :आई, तुझ्यासाठी माझी काय किंमत आहे?
आई : बेटा , तू करोडोंमध्ये एक आहे…
मुलगा : मग त्या करोडो रुपयांपैकी मला ५०० रुपये दे, मला माझ्या गर्लफ्रेंडसाठी एक भेटवस्तू खरेदी करायची आहे…
मुलगा : आई, गांधीजींच्या डोक्यावर केस का नव्हते?
आई : कारण बेटा, ते फक्त सत्यवादी होते
मुलगा : आता मला समजलं की तुम्हा बायकांचे केस एवढे लांब का असतात…
मुलगा : आई बाबा फार सभ्य आहेत
आई : ते कसं बेटा
मुलगा : कारण ते जेव्हाही सुंदर स्त्रीला पाहतात, आपला एक डोळा झाकून घेतात
आई : बाळा काय करत आहेस
मुलगा : आई वाचत आहे
मुलगा : व्वा, काय वाचत आहेस?
आई : तुमच्या होणाऱ्या सुनेचे मेसेजेस…
मुलगा : आई, मला वाटतंय की माझ्याच्याने अभ्यास नाही होत आहे
आई : असं वाटतंय, तुला व्हिटॅमिन चप्पलची फार गरज आहे