Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! हसणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचं असतं. कामाच्या व्यापात लोक हसणं कुठेतरी विसरून गेले आहेत. अशात हवालदार आणि कैद्याचे हे मिश्किल जोक्स तुम्हाला नक्कीच खळखळून हसवतील.
पहिला कैदी : पोलिसांनी तुला का पकडले?
दुसरा कैदी : बँकेत दरोडा टाकल्यानंतर तिथेच पैसे मोजायला घेतले तर पोलिसांनी पकडलं
पहिला कैदी : अरे मग, तिथेच पैसे कशाला मोजत बसलास?
दुसरा कैदी : तिथे लिहिले होते की काउंटर सोडण्यापूर्वी पैसे मोजा, नंतर बँक जबाबदार राहणार नाही…
एका माणसाला १० वर्षांनी तुरुंगातून सोडण्यात आले, तो थकलेला आणि जुने आणि घाणेरडे कपडे घालून घरी परतला
घरी पोहोचताच त्याची पत्नी ओरडली, “तू इतका वेळ कुठे फिरत होतास?
तुला तर ३ तासांपूर्वीच सोडण्यात आलं होत ना… ?
हे ऐकताच तो माणूस पुन्हा तुरुंगात परतला…
जेलर : मी ऐकलंय की तू शायर आहेस, मग मला काहीतरी ऐकव…
कैदी : गम ए उल्फत मे जो जिन्दगी कटी हमारी, जिस दिन जमानत हुई जिन्दगी खतम तुम्हारी…
जेलर : उद्या तुला फाशी दिली जाईल, तुझी शेवटची इच्छा काय आहे ते सांग?
कैदी : मला कलिंगड खायचं आहे…
जेलर : पण हा कलिंगडचा सीजन नाही.
कैदी : काही हरकत नाही, मी वाट पाहू शकतो…
सैनिक : चल भाऊ, तुला फाशी देण्याची वेळ आली आहे
कैदी : पण मला २० दिवसांनी फाशी देणार होते
सैनिक : जेलर साहेबांनी मला सांगितले आहे की तू त्याच्या गावचा आहेस, म्हणून तुझे काम प्रथम करणार.. .
कॉन्स्टेबल : साहेब, तुरुंगात सर्व कैद्यांनी रामायण प्ले केला होता
जेलर : ही तर चांगली गोष्ट आहे, तू इतका नाराज का आहेस?
कॉन्स्टेबल : साहेब, समस्या अशी आहे की हनुमान बनलेला कैदी अजून पण “संजीवनी” घेऊन आला नाही…
पहिला कैदी : तू इथे कसा आलास, तू काय केलं होत?
दुसरा कैदी : काय नाय रे मी दुकान उघडलं होत…
पहिला कैदी : दुकान उघडलं म्हणून तुला जेलमध्ये टाकलं?
दुसरा कैदी : हो
पहिला कैदी : पण का असं??
दुसरा कैदी : अरे ते मी दुकान हातोड्याने उघडलं ना…
जेलर : अरे, कैद्या, तू काल रात्री का पळाला होतास?
कैदी : साहेब, मला थोडं फिरायला जायचं होतं.
जेलर : मग परत का आलास?
कैदी: फिरायला मजा नाही आली, साहेब! सगळीकडे तुम्हीच होतात
जेलर : अरे, तू तर म्हणत होतास की तू खूप श्रीमंत आहेस?
कैदी : हो, होतो.
जेलर : मग इथे कैदेत का आहेस?
कैदी : माझ्या बायकोने सांगितले की, ‘पैसा वाचवण्यासाठी थोडा वेळ तुरुंगात घालवा.
पोलीस : काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
बेवडा : प्रवचन ऐकायला…
पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे? बेवडाः दारू पासून होणारे दुष्परिणाम,
पोलीस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन बेवडा: माझी बायको…
Web Title: Panchat jokes last wish of theif shocked policeman but will make you laugh out loud read marathi jokes