Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Police Recruitment: महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती! १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश

धाराशिव जिल्ह्यात ११ ते २७ फेब्रुवारीदरम्यान पोलीस भरती प्रक्रिय सुरु झाली असून १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 11, 2026 | 06:07 PM
महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती! १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश

महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती! १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश

Follow Us
Follow Us:

धाराशिव : महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदांच्या रिक्त जागांसाठी यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील मंजूर पदे भरण्याची प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ती २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई या पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेस मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.

पदनिहाय जागा व अर्ज संख्या चालक पोलीस शिपाईपदाच्या २५ जागा असून यासाठी १०,३८५ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर
पोलीस शिपाईपदासाठी १२३ जागा असून यासाठी ४,८१७ अर्ज आले आहेत. या आकडेवारीवरून भरती प्रक्रियेत तीव्र स्पर्धा असल्याचे स्पष्ट होत आहे.

सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी कार्यपद्धती जाहीर; UGC निकषांवर आधारित भरती

भरती प्रक्रियेची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून त्यासाठी टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. शारीरिक मोजमाप चाचणीत सर्व उमेदवारांची उंची व छाती मोजमाप तपासले जाईल. पन्नास गुणांच्या मैदानी चाचणीत शारीरिक मोजमापात पात्र ठरलेल्या उमेदवारांची धावणे व इतर शारीरिक कसोटीची मैदानी चाचणी घेतली जाईल. तर पन्नास गुणांच्या कौशल्य चाचणीत चालक पोलीस शिपाई पदासाठी पात्र उमेदवारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे. दरम्यान, जर कोणत्याही दिवशी तांत्रिक कारणामुळे मैदानी चाचणी घेता आली नाही, तर संबंधित उमेदवारांना पुढील योग्य तारीख देण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी आवश्यक कागदपत्रे

शारीरिक व मैदानी चाचणीस उपस्थित राहताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. त्यात
महाआयटीकडून प्राप्त झालेले आवेदन अर्ज व प्रवेशपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन चालक परवाना (चालक पदासाठी अर्जदारांसाठी आवश्यक), सर्व संबंधित शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे ५ फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. कागदपत्रांची पूर्तता नसल्यास उमेदवारांना पुढील प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे सर्वांनी पूर्वतयारीनिशी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पारदर्शकतेवर भर

भरती प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. उमेदवारांनी वेळेचे काटेकोर पालन करून शिस्तबद्ध वर्तन ठेवावे, असेही प्रशासनाने नमूद केले आहे. पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांनी दिलेल्या सूचनांची नोंद घ्यावी व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी केले आहे.

बीएड-डीएडधारकांची नोकरीसाठी वणवण! शासनाच्या शिक्षक भरती धोरणावर निर्माण होताहे सवाल

Web Title: Police recruitment process in dharashiv district from february 11 to 27 news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • Dharashiv
  • police
  • Police Recruitment

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Chandrapur Crime : नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक
2

Chandrapur Crime : नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
3

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत
4

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.