चालू फेऱ्यांमध्ये पंडित जी भडकले, केलं असं काही की... पाहून तुम्हालाही बसेल धक्का, Video Viral
सोशल मीडियाचे जग फार वेगळे आहे. इथे रोज काही ना काही व्हायरल होत असते आणि ते पाहून लोक कधी कधी आश्चर्यचकित होतात कारण त्यांना असं काही पाहण्याची अपेक्षा नसते. काही व्हायरल व्हिडिओ लोकांना हसायला भाग पाडतात तर काही आश्चर्याचा धक्का देऊन जातात. इथे लग्नाचेही अनेक अतरंगी व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या असाच एक लग्नातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्नसमारंभातील हा व्हिडिओ तुम्हाला अचंबित करेल, लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. नक्की काय आहे यात? चला जाणून घेऊयात.
लग्नाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात अनेक अतरंगी गोष्टी पाहायला मिळतात. लोक हे व्हिडिओज फार मजा घेऊन पाहत असतात, ज्यामुळे ते नेहमीच व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर लग्नातील एक अजब प्रकार व्हायरल झाला. यात लग्नातील भडजी अशा प्रकारे भडकताना दिसून आले की त्यांनी थेट लागसमारंभातील नवरा-नवरीचे फेरेच थांबवले. भडजींचे हे असे रूप तुम्ही क्विचितच कधी पाहिले असेल. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी तो खूप एन्जॉय केला मात्र यात नक्की काय घडले आणि भडजी भरलग्नात नक्की कशामुळे भडकले तर चला जाणून घेऊयात.
काय घडले व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर लग्नाच्या फेरे घेताना दिसत आहेत. यावेळी त्यांचे मित्र त्याच्यावर फुलांचा वर्षाव करताना दिसून येत आहेत. मात्र यावेळी ते आरामात नाही तर फार जोरात फुले फेकून मारत असतात. इथं पर्यंत सर्व ठीक असते मात्र तितक्यात ही फुल वधू-वरांसह पंडितजींच्या अंगावर कोसळली जातात, ज्यामुळे पंडितजी भडकतात आणि नंतर ते कल्पनेपलीकडची गोष्ट करून बसतात. यावेळी हातात थाळी किंवा पेटी असं काहीतरी असतं जे ते समोर उभ्या असलेल्या मुलांवर रागाने फेकतात. त्यांची ही प्रतिक्रिया पाहून सर्वच हादरतात. पंडितजींचा हा राग पाहून वर-वधू देखील फेरे मध्येच थांबवतात आणि व्हिडिओचा इथेच शेवट होतो.
Kalesh b/w a Pandit ji and Some Guys over throwing Flower during Marriage Ritual’s:
pic.twitter.com/qC3vSabKRj— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 26, 2024
बिबट्याने हल्ला चढवताच माकडाने बोलावली संपूर्ण टोळी, मग जे झालं… पाहून उडेल थरकाप; Video Viral
लग्नाचा हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,’ पंडित जी आणि काही लोक लग्नाच्या विधी दरम्यान फुले फेकताना झाला कलेश’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पंडितजी इतके रागावत नाहीत, ते प्रेमानेही बोलू शकले असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “विराट कोहली पंडितजींच्या भूमिकेत आला होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.