(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बिबट्या आणि माकडांच्या युद्धाशी संबंधित एक मनोरंजक आणि रोमांचक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका बिबट्यालवर माकडांच्या टोळीने हल्ला चढवत त्याला पळता भुई एक केल्याचे दिसूनआले. माकड एकटे असल्याचे समजून बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. पण घडले काही भलतेच. माकडाची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्यावरच माकडांच्या टोळीने हल्ला केला आणि त्याची नाकीनऊ एक करून सोडली. यावेळी माकडाच्या टोळीने बिबट्याला अशाप्रकारे घेरले के पाहून कुणाचाही थरकाप उडेल. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता तो वेगाने व्हायरल होत आहे.
बिबट्याचा हल्ला सुरू होताच माकडांची संपूर्ण फौज झुडपातून बाहेर आली आणि माकडांनी बिबट्याला घेरायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने बिबट्या घाबरला आणि त्याला काय झाले ते समजले नाही. माकडांच्या वेगवान प्रतिक्रियेने बिबट्याला पूर्णपणे आश्चर्यचकित केले. आपण माकडाला सहज पकडू असा तो विचार करत होता त्याच्या अगदी उलट निघाले. स्वतःला वाचवण्यासाठी बिबट्या धडपड करू लागला मात्र माकडांच्या सैन्याने त्याला पूर्णपणे घेरले होते. व्हिडिओत पुढे काय घडले? चला जाणून घेऊयात.
काय घडले व्हिडिओत?
माकडांच्या हल्ल्यानंतर बिबट्या चांगलाच घाबरला आणि जीव वाचवण्यासाठी तेथून पळ शोधू लागला. माकडांना टाळून तो कसा तरी जंगलाच्या दुसऱ्या भागाकडे धावला. माकडांनी त्याला पूर्णपणे घेरले होते आणि बिबट्या आता त्याच्या ताकदीपेक्षा जास्त जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. हा पलटवार बिबट्याला फारच आश्चर्यकारक वाटला आणि त्याने आपला पराभव मान्य करून घटनास्थळावरून पळ काढला. हा व्हिडिओ जंगलातील आश्चर्यकारक आणि मजेदार दृश्ये दर्शवितो, जेथे कोणीतरी असा विचार करतो की तो एकटा आहे हे पूर्णपणे चुकीचे सिद्ध होऊ शकते.
बिबट्या आणि माकडांचा संघर्षमय लढतीचा हा व्हिडिओ @Latestsightings नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘बिबट्याला भिडली माकडं’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बिबट्याला हाताळणाऱ्या त्या बॉसने दाखवून दिले की तो नेता होण्यास पात्र का आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मोठा नर ज्या प्रकारे बिबट्यासमोर येतो आणि “टॅकल” करतो ते खूप आश्चर्यकारक आहे! तो परिस्थिती ऐकतो/पाहतो आणि त्याच्या गटाचे रक्षण करण्यासाठी दुसऱ्या बाजूने धावतो. अविश्वसनीय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.