Pitbull fatally attacks toddler Horrifying video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक भयावह घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका पिटबुल श्वानाने भर रस्त्यात चिमुकलीवर हल्ला केला आहे. या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील रोहिणी भागातील असल्याचा दावा व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन चिमुकले एका घराबाहेर उभे असलेले दिसत आहेत. तिघेजण कोणाच्या तरी येण्याची वाट पाहत आहेत. याच वेळी एक श्वान अचानक बाहेर धावत येते. या पिटबुल जातीचे हे श्वान असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत. श्वान बाहेर येताच मुले बाजूला होतात. परंतु एका चिमुकल्याला श्वान जोरात चावा घेतो. तुम्ही पाहू शकता की, चिमुकल्याला श्वानाने चांगलेच पकडलेले आहे.
तसेच इतर दोन मुले श्वानापासून चिमुल्याला वाचण्याचा प्रयत्न देखील करत आहे, परंतु श्वान चिमुकल्याला सोडत नाही. त्याला फरपटतो, त्याच्या हाताचा लचका तोडतो. चिमुकल्याच्या रडण्याचा आणि आरडा-ओरडा करण्याचा आवाज ऐकून माणसे बाहेर येतात आणि चिमुल्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. हा व्हिडिओ इथेच संपला आहे. यानंतर चिमुकल्याचे नेमकं काय झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
कुत्ता नहीं छोटी गाय पुंगनूर पालें#रोहिणी_हादसा
भयावह, भयंकर, भयानक, असहनीय, निरुत्तर
Dog (कुत्ता) पालने वाले व्यक्तियों के लिए सन्देश I
उस बच्चे के परिवार वालों से पूछें कि उन पर क्या बीत रही है ?
शायद कुछ लोगों का बुद्धि विकास हो जाए I pic.twitter.com/SFqgyY45Od
— Dilip Kumar Singh (@DilipKu24388061) July 8, 2025
दरम्यान अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओ शेअर करत दिल्लीतील रोहिणी भागातील असल्याचा दावा केला आहे. परंतु या व्हिडिओचे रिव्हर्स इमेज करुन सर्च केल्यावर हा व्हिडिओ तीन वर्षापूर्वी असल्याचे आढळले आहे.
दरम्यान व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @DilipKu24388061 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहे. हा भयावह व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.