सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स यांशिवाय अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही रस्त्यावर मेहनतीने गुलाब, पेन, किचेन्स अशा छोट्या छोट्या वस्तू विकणाऱ्या लहान चिमुकल्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. परिस्थितीमुळे शाळा शिकण्याचा, आनंदाने आयुष्य जगण्याच्या वयात त्यांना पोटापाण्यासाठी राबावे लागते. सिग्नलवर उभे राहून हे चिमुकले लोक आपल्याकडील वस्तू विकत असतात. सध्या एका गुलाब विकणाऱ्या चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये चिमुकली भर रस्त्यात ढसा ढसा रडताना दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ride_with_shikhar या अकाउंटवर तरुणाने शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, चिमुकली सिग्नलवर गुलाब विकत होती. यावेळी ती गुलाब विकण्यासाठी एका ऑटोरिक्षाच्या मागे धावली. ऑटोरिक्षात बसलेल्या प्रवाशाला गुलाब विकण्यासाठी चिमुतली ऑटोमागे धावत होती. यावेळी त्या ऑटोचालकाने तिला थपड्ड मारली. यामुळे चिमुकली भर रस्त्यात ढसा ढसा रडत होती.
तरुणाला चिमुकली रडताना पाहिले तेव्हा त्याने गाडी थांबवून तिची विचारपूस केली, तिला पैसेही दिले. परंतु चिमुकलीने ते पैस घेतले नाहीत. चिमुकली खूप रडत होती. तरुणाने चिमुकलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सध्या शिखर नावाच्या तरुणाने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोटा येथे घडली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
तरुणाने व्हिडिओ शेअर करताना व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “चिमुकली पैसे मिळाले नाही म्हणून रडत नव्हती, तर जगाने तिला अपयशी ठरवले म्हणून रडत होती. गुलाब विकण्यासाठी तिने ऑटोचा पाठलाग केला. यामुळे ऑटो ड्रायव्हरने तिला थपड्ड मारली. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पैसेही देऊ केले पण, तिने ते नाकराले. गर्वाने नाही तर वेदनांनी. चला चांगले मानव बनूया. मानवता अजूनही आहे असे कोणीतरी मानण्याचे कारण बनूया. एकत्रितपणे, जागरूकता आणि सहानुभूती पसरवूया” यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी भावा तू मन जिंकंले सगळ्यांचे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






