Momos आणि Dim Sums मध्ये काय फरक आहे? युजर्सचे मजेदार उत्तर ऐकून पोट धरून हसाल
मोमो, ज्या व्यक्तीने हे नाव दिले, त्याने जास्त मेहनत न करता मोच्या वर आणखी एक मो जोडला आणि तो मोमो झाला. असे ऐकले आहे की हे दोन अक्षरी व्यंजन देखील दोन प्रकारचे असतात. एक आहे- स्टीम मोमो, जो वाफवून बनवला जातो आणि दुसरा म्हणजे – फ्राइड मोमो, जो तळलेला असतो. मोमो हा एक पाश्चात्य खाद्यपदार्थ असून देशभर याचे चाहते पाहायला मिळतात.
भारतातही मोमोची क्रेझ काही कमी नाही. आता लहान मुलं भजी, समोसे नाही तर मोमोचे प्रेमी बनले आहेत. आता मोमो आला तर मोमोचा भाऊदेखील यायला हवा. मोमोप्रेमींच्या तोंडून अनेकदा मोमोच्या या भावाबद्दल ऐकायला मिळते. याचे नाव आहे, डिम सम. आता अनेकांना मोमो आणि डिम सम यात नक्की काय फरक आहे ते समजत नाही. यातील फरक विचारला की नेहमीच लोक गोंधळताना दिसून येतात.
हेदेखील वाचा – पाकिस्तान ते पाकिस्तानच! उद्घाटन होताच लोकांनी लुटला मॉल, तासाभरात बिसनेसमॅन झाला कंगाल, Video Viral
वास्तविक आता इंटरनेटला आता मोमो आणि डिम सममधील फरक जाणून घ्यायचा आहे. एका युजरने आता यातील फरक उलगडून सांगितला आहे जो सध्या सोशल मेडियावर फार व्हायरल होत आहे. आता पोस्ट व्हायरल होत आहे म्हणजे यावर लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया तर येणारच. आज पण याच व्हायरल पोस्टवरील काही मजेदार उत्तरांविषयी जाणून घेणार आहोत. पोस्टवरील लोकांच्या प्रतिक्रिया वाचून तुम्ही पोट धरून हसाल एवढे नक्की. ही पोस्ट @RishabhKaushik नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे.
Am I right or I am right?😭 pic.twitter.com/F9o8lUE9Sy — Rishabh Kaushik (@RishabhKaushikk) September 1, 2024
एका युजरने एक्सवर चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला. ज्यामध्ये मोमो आणि डिम सममधील फरक विचारला जात होता. आणि याचं उत्तर आहे की फरक भांड्यांमध्ये आहे. बांबूच्या टोपलीत येणारे डिम सम्स आणि प्लेटमध्ये येणारे मोमोज असा फरक त्याने सांगितला आहे. असे म्हटले जाते की काही मोमो डिमसम असू शकतात, परंतु सर्व डिमसम मोमो नसतात. हा तर्काचा प्रश्न आहे असे वाटते. म्हणूनच, या कठीण प्रश्नांव्यतिरिक्त, आपण मनोरंजक उत्तरांबद्दल बोलूया.
हेदेखील वाचा – बाइक चालवताना ओढणी हँडलमध्ये अडकली, गळ्याला बसला फास अन् नंतर जे घडलं… घटनेचा Video Viral
एका युजरने कमेंट्स करत यातील फरकाबाबत सांगताना लिहिले की,
मोमो – 50 रुपये
डिम सम (तीच गोष्ट फॅन्सी बॉक्स आणि नावासह) – 450 रुपये
तर काहींनी सांगितले की मोमो हा हाताने खाल्ला जातो आणि बांबूच्या काठ्या-चॉस्टिक्सने डिम सम खाल्ले जाते. ही अतिशय गोंधळात टाकणारी बाब आहे. पण त्यांच्यात काय फरक आहे, हे आता तुमच्यावर अवलंबून आहे.