(फोटो सौजन्य: Instagram)
काळाचा घाला! सामना सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, रायडर आणि शाळेत जाणाऱ्या मुलामधील एक संभाषण ऐकू येतो. आपल्या गाडीवरुन जात असताना रायडरला एक मुलगा आवाज देतो. मुलाने शाळेचा गणवेश घातलेला असतो आणि तो शाळेत जाण्याच्या तयारीत असतो. रायडर जेव्हा त्याला विचारतो की गाडी तू बुक केली आहे का तेव्हा मुलगा त्याच्याकडे एक वेगळीच विनंती करु लागतो.
मुलगा रायडरजवळ येतो आणि १० मिनिटांसाठी तुम्ही माझे बाबा व्हाल का? असा प्रश्न रायडरला करतो. रायडर हे ऐकून फार थक्क होतो. रायडर म्हणतो की, तुझी आई तर तिथे आहे तिला घेऊन जा. यावर मुलगा म्हणतो की, “आज माझ्या शाळेत फादर्स डे आहे. माझे बाबा कामावर आहेत. ते कधीच शाळेत येत नाहीत. जर माझ्या मित्रांना कळले की बाबा इथे नाहीत, तर ते मला चिडवतील.” यावर रायडर म्हणतो की, “मी तुझा बाबा झालो आणि कुणी मला पकडलं तर?” यावर मुलगा म्हणतो की, “शिक्षकांसमोर जाऊन फक्त हसा, बाकी सर्व मी बघून घेईन”. नंतर रायडर मुलाला म्हणतो की तुझ्या आईला तू शाळेत घेऊन जा ज्यावर मुलगा म्हणतो की फादर्स डे आहे ना तर सर्व मुलं वडिलांना घेऊन येतील. या सर्व संभाषणानंतर शेवटी रायडर मुलाचे वडिल बनून शाळेत जायला तयार होतो. मुलगा रायडरच्या राडीवर बसतो आणि ते दोघेही तिथून निघून जातात.
View this post on Instagram
हा व्हिडिओ @rohitvlogster नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडिओला आतापर्यंत १ मिलियनहून अधिकचे लाईक्स मिळाले आहेत. यूजर्स मुलाची निरागसता पाहून त्याच्यावर घायाळ झाले आणि कमेंट सेक्शनमध्ये सर्वच रायडरला त्याचा वडिल बनून जा रे अशी मागणी करताना दिसले. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “मुलाचा निरागसपणा खूपच छान दिसत आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर बाबा पुढच्या वर्षी गेले, तर शाळेतले लोक आईबद्दल काय विचार करतील”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अशा वेळी वडिलांनी मुलांच्या सोबत उपस्थित असायसा पाहिजे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






