जीवाचा थरार! लाइव्ह इंटरव्यूदरम्यान रॅपरने स्वतःलाच झाडली गोळी, पाहून तुम्हीही व्हाल दंग; Video Viral
मुलाखती दरम्यान अनेक मजेदार घटना घडत असतात. वाढत्या तंत्रज्ञानानुसार, मुलाखतींमध्येही बरेच बदल दिसून आले. पूर्वी मुलाखत घेतल्याच्या बऱ्याच दिवसांनंतर ती प्रसारित केली जायची मात्र आता लाइव्ह मुलाखत घेतली ज्याचे युजर्स जे ते त्याचवेळी पाहू शकतात. मात्र या अशा लाइव्ह इंटरव्ह्यूमध्ये कोणतीही गोष्ट लपवली जाऊ शकता नाही ज्यामुळे अनेकदा काही अनावश्यक गोष्टी युजर्ससमोर घडतात ज्या सर्वांना थक्क करून सोडतात. सध्या असाच काहीसा प्रकार आजच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये घडून आल्याचे दिसून आले आहे.
तर घडते असे की, 46 वर्षीय टेक्सास रॅपर 2Lo याची एक लाइव्ह मुलाखत सुरु असते आणि यावेळीच अचानक एक धक्कादायक प्रकार घडून येतो जो सर्वांनाच हादरवून सोडतो. ही घटना कॅमेरात कैद होते आणि लाइव्ह असल्याकारणाने ती लाखो लोकांपर्यंत पोहचली जाते. यात नक्की काय घडते ते आपण व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
काय आहे प्रकरण?
‘वन ऑन वन विथ माइक डी’ या यूट्यूब शोसाठी दिलेल्या मुलाखतीदरम्यान ही घटना घडली. रॅपर 2Lo त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि भविष्यातील संगीत योजनांबद्दल बोलण्यासाठी आला होता. जेव्हा मुलाखतकार त्याला त्याच्या आयुष्यातील निवडीबद्दल विचारतो तेव्हा रॅपर 2Lo लो त्याच्या पॅन्टच्या खिशात हात घालताना दिसतो आणि याच्या पुढच्याच क्षणी नको ती दुर्घटना घडून येते. त्याने आपल्या खिशात हात घालताच त्याच्या नकळत खिशातून एक गोळी सुटते आणि त्याच्या पँटला एक छिद्र पडते. यावेळी रॅपर आणि मुलाखतकार दोन्ही घाबरतात आणि ही सर्व घटना लगेच सोशल मीडियावर व्हायरल होते.
🔥🚨DEVELOPING: This rapper is going viral for shooting himself in the leg during this interview. pic.twitter.com/iwp6ceSwBm
— Dom Lucre | Breaker of Narratives (@dom_lucre) January 4, 2025
गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर मुलाखतकार आणि कॅमेरामन “काही नाही झाले, सगळे ठीक आहेत ना?” नाही, असे बोलून सर्वजण एकमेकांचे सांत्वन करतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, सर्वांनी रॅपर 2Lo च्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याने मुलाखतीला बंदूक का आणली? असा प्रश्न सर्वांनी उपस्थित केला. एका युजरने लिहिले, “आपल्या सर्वांना जीवनात पर्याय आहेत, त्याने चेंबरमध्ये एकासह त्याच्या पँटमध्ये पिस्तूल घेऊन फिरणे निवडले” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “नक्की कोणी कोणाला मारले”. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @dom_lucre नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.