(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
शाळेचा निरोप असो किंवा विद्यापीठाचा निरोप समारंभ असो, हे असे क्षण असतात जेव्हा विद्यार्थीआपले शालेय जीवन शेवटचे जगत असतात. काही लोक हे क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात, तर काहीजण ड्रेसवर स्केचेस बनवून आपल्या मित्रांना निरोप देतात. मात्र नुकतेच हरिद्वार येथील एका शाळेच्या निरोप समारंभात शाळेतील फेअरवेल पार्टीचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात विद्यार्थ्यांनी हवेत गोळीबार करून गोंधळ घातल्याची खळबळजनक घटना दिसून आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी 70 अज्ञात विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चला या प्रकरणाविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हरिद्वार, उत्तराखंडमधील एका प्रतिष्ठित शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या निरोपाच्या पार्टीत धोकादायक स्टंटबाजी करत हवेत गोळ्या झाडल्या. विद्यार्थ्यांच्या या प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुमारे 70 विद्यार्थ्यांचा ताफा दिसून येत आहे. ते हरिद्वारजवळील भेल स्टेडियमजवळ जमले होते. काहीजण त्यांच्या कारने स्टंट करताना दिसतात तर काही हवेत गोळ्या झाडताना यात दिसून आले आहे.
बोट दुर्घटनेचा थरार! काही क्षणातच शेकडो लोक झाली समुद्रात विलीन, Viral Video नक्की कुठला?
व्हिडिओत काय दिसून आले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, काही विद्यार्थी चालत्या कारच्या छतावर उभे राहून व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 223,125 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे व्हायरल व्हिडिओच्या आधारे विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच आता मोठा धुमाकूळ माजवत आहे. यातील दृश्ये पाहून अनेक लोक थक्क झाले आहेत.
हरिद्वार में नामचीन स्कूल के छात्रों ने होटल में फेयरवेल पार्टी की। फिर सड़क पर गाड़ियों से स्टंटबाजी की, आतिशबाजी की और फायरिंग भी की। पुलिस ने 70 अज्ञात छात्रों पर FIR दर्ज की। pic.twitter.com/uBIeFHfl4R
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) January 5, 2025
या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हरिद्वारमधील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थ्यांनी हॉटेलमध्ये फेअरवेल पार्टी केली. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर वाहनांसह स्टंटबाजी केली, फटाके फोडले आणि गोळीबारही केला. पोलिसांनी 70 अनोळखी विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला’ असे सांगण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “आजकाल मुलं आपले संस्कार मूल्य आणि प्रतिष्ठा विसरली आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते सर्व आवारागिरी करत आहेत”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.