(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जंगलाचा राजा जरी सिंह असला तरी संपूर्ण जंगलावर वाघाचे अधिराज्य चालत असते. बऱ्याचदा त्याच्या शक्तीपुढे सिंहालाही आपली हार मानवी लागते. वाघ हा मुळातच आपल्या थरारक आणि चपळ शिकारीसाठी ओळखला जातो, तो जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. वाघापुढे प्राण्यांचीच काय तर माणसांचेही काही चालत नाही. त्याला पाहतच लोक आपली वाट उलटी करून पळू लागतात. एकदा का वाघाच्या निशाणावर कोणी आले तर त्याचे जिवंत वाचणे फार कठीण होऊन बसते. अशात यावेळी वाघाणे नव्हे तर वाघाच्या पिल्लाने केलेल्या एका थरारक शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे.
‘जसा बाप तसाच लेक’ ही म्हण या व्हायरल व्हिडिओतून खरी होत असल्याचे दिसून येत आहे. वाघच काय तर वाघाचे पिल्लूही आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचे उत्तम उदाहण आजच्या या व्हिडिओत दिसले. यात वाघाच्या काही पिल्लांची मिळून एका भल्यामोठ्या हरणाची शिकार केल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओतील शिकारीचा जीवघेणा थरार तुमच्या अंगावर काटा आणेल. दरम्यान या खतरनाक शिकारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक यातील दृश्ये पाहून दंग झाले आहेत.
काय आहे व्हिडिओत?
माहितीनुसार, ही घटना राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये घडून आली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक हरीण नदीवर बेसावधपणे पाणी पित असतो. याचवेळी वाघाच्या काही पिल्लांनी त्यावर मागून हल्ला केला. व्हिडिओत हरणाच्या मागून त्याची शिकार करण्यासाठी पळत असलेली वाघाची पिल्ले दिसून येतात. हरीण जीवाच्या आकांताने त्यांच्यापासून पाळण्याचा प्रयत्न करतो मात्र नदीच्या तळाशी ते त्याला घेरतात आणि निर्गुणपणे त्याची शिकार करतात. शेवटी या खेळात पुन्हा शिकारीचं विजयी ठरतो आणि हरणाला आपले प्राण गमवावे लागते.
बोट दुर्घटनेचा थरार! काही क्षणातच शेकडो लोक झाली समुद्रात विलीन, Viral Video नक्की कुठला?
शिकारीचा हा व्हिडिओ @ranthambhorepark नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रणथंबोरमध्ये एक थरारक सामना! रणथंबोरमध्ये वाघांनी हरणाची शिकार केली’ असे सांगण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते मोठे होत आहेत हे पाहून आनंद वाटला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वाघ हे एकटे शिकारी आहेत, मला आश्चर्य वाटते की त्यांनी केव्हापासून ग्रुपमध्ये हल्ला करायला सुरुवात केली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.