भारताचे महान योद्धा आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आजही अनेकांच्या मनामनात रुजलले आहेत. त्यांचा इतिहास आजही प्रत्येक मराठ्यांच्या मनात घर करून बसला आहे. आजही महाराजांच्या पराक्रमांचे साक्षीदार आहेत त्यांनी जिंकलेले किल्ले. अनेकदा बरेच शिवप्रेमी महाराजांसाठीचे आपले प्रेम व्यक्त करताना त्याच्या गडकिल्य्यांना भेट देत असतात . तर काहीजण सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओज आणि फोटोज शेअर करत असतात . सध्या असाच एक महाराजांवर आधारित एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील दृश्ये अनेक शिवप्रेमींच्या पसंतीस पडत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
[read_also content=”कमळातून नवरा नवरीची वरात! निवडणूक निकलादरम्यान लग्नाच्या वारातीचा अनोखा अंदाज, व्हिडिओ व्हायरल https://www.navarashtra.com/viral/unique-shadi-baraat-video-gone-viral-542642.html”]
काय आहे व्हिडिओत
व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, ढगाळ वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणात, ढगांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसत आहे. सध्याच्या युगात आपण एआय निर्मित अनेक गोष्टी बघितल्या असतील त्यातच आता एआयद्वारा निर्मित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही यात शामिल झाला आहे.
फोटोतील त्यांचे सुंदर रूप फारच छान दिसत आहे. या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला आकाश दिसेल. या आकाशात ढग दिसत आहेत आणि या ढगांमध्ये जर तुम्ही नीट पाहाल तर तुम्हाला या ढगांमध्ये एक प्रतिमा दिसून येईल. ही प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. हा फोटो पाहून कोणीही थक्क होईल. अतिशय स्पष्टपणे महाराजांची प्रतिमा यात दिसून येत आहे.
हा फोटो @shivaji-maharaj-history या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोला “आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे,हर हर महादेव,” असे कॅप्शन देण्यात आले आहे . या फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. तर अनेकांनी या पोस्टच्या कमेंट्समध्ये अनेकांनी जय शिवराय, असा नारा लावला आहे.