
Rat spotted in KFC’s kitchen
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील केएफीसच्या रेस्टॉरंटमधील आहे. यामध्ये केएफसीच्या किचनमध्ये उंदीर मामा इकडून तिकडून उड्या मारताना, खाद्यपदार्थ खाताना दिसत आहे. बर्गर बनवणयाच्या किचनवर उंदीर मामाचा खेळ सुरु आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडिओवरुन लोकांनी बाहेरचे खाणे किती घाणेरडे असते हे लक्षात येते असे म्हटले आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. विशेष करुन खवय्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.
Rat spotted in KFC’s kitchen! 🐀
📍Branch: RDC, Ghaziabadpic.twitter.com/7BT5lX7TbF — Greater Noida West (@GreaterNoidaW) December 17, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @GreaterNoidaW या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. KFC मधील C म्हणजे चूहा अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एकाने बंगळुरु येथे देखील मॅकडोनाल्डसमध्ये उंदीर मामा दिसले असल्याचे आणि तक्रार दाखल केले असल्याचे म्हणत व्हिडिओ शेअर केला आहे, तसेच आणखी एकाने तो (उंदीर) शेफ आहे, असे म्हटले आहे. सध्या अनेकांनी अशा आउलेट्सवर कारावाईची मागणी केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.