Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral

Bike Set Fire : रागाच्या भरात नको ते घडलं... तरुणाने चक्क लायटरने पेट्रोल पंपावरच पेटवली बाईक. घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून युजर्सने तरुणावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 21, 2026 | 10:00 AM
क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral

क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • किरकोळ वादातून मोठा अनर्थ.
  • रागाच्या भरात चक्क बाईकलाच लावली आग.
  • पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
संतापाच्या भरात अनेकदा लोक वाटेल त्या थराला जातात. संतापातही मन थाऱ्यावर असणं फार गरजेचं असतं अन्यथा अनर्थ होऊ शकतो. अलिकडे अशीच एक घटना सोशल मिडियावर वेगाने शेअर करण्यात आली आहे ज्यात तरुणाने रागात संपूर्ण बाईकलाच आग लावल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे ही घटना पेट्रोल पंपावर घडली ज्यामुळे धोका आणखी वाढला. माहितीनुसार, बाईकमध्ये पेट्रोल भरत असताना तरुण बाजूला उभा राहून सिगारेट पित होता. जेव्हा बाईकस्वाराने त्याला सिगारेट पिण्यास मनाई केली तेव्हा रागात त्याने बाईकलाच आग लावण्याचा निर्णय घेतला. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

शार्कच्या घोळक्यात मधोमध जाऊन अडकला ‘पाण्याचा दैत्य’, भयावह झाले दृष्य अन् घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

छत्तीसगडमधील रायपूर येथील एका पेट्रोल पंपावर गुरुवारी संध्याकाळी झालेल्या किरकोळ वादामुळे मोठी आग लागली. बाईकस्वाराने तरुणाला सिगारेट पिण्यास मनाई करताच त्याने रागात बाईकच्या पेट्रोल नोजलला आत लायटरने आग लावली ज्यामुळे आगीचा मोठा भडका उठला. आग पाहताच बाईकस्वार आणि पेट्रोल कर्मचारी आपला जीव वाचवण्यासाठी तिथून बाजूला होताना दिसून येतात.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उरला येथील एका पेट्रोल पंपावर घडली, जिथे मोटारसायकलवरून दोन जण त्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले होते. धर्मेंद्र क्षत्रिय आणि इम्रान अशी त्यांची ओळख पटली आहे. इंधन टाकी उघडली जात असताना इम्रान दुचाकीवर बसून राहिला, तर धर्मेंद्र जवळच उभा होता. दुचाकीजवळ उभ्या असलेल्या त्या व्यक्तीने गाडीत इंधन भरत असताना सिगारेट काढली आणि ती पेटवण्याचा प्रयत्न केला. परिसरात धूम्रपान करण्यास मनाई असल्याने इम्रानने धर्मेंद्रला सिगारेट पेटवण्यास मनाई केली तर रागाच्या भरात धर्मेंद्रने ताबडतोब त्याचा लाईटर घेतला आणि इंधन नोजल पाईपला आग लावली. आग लागल्याचे समजताच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्रांचा वापर करून आग विझवली.

NH-48 साईन बोर्डावर आदळली थार, हवेतच लटकली अन् दृष्य पाहून युजर्स चक्रावले… Video Viral

पोलिसांनी सांगितले की, जळत्या इंधनाचा काही भाग आरोपींवरही पडला. दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पंप कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले, त्यांनी पोलिसांना कळवले आणि तक्रार दाखल केली. उरला पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि तक्रारीच्या आधारे दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यूजर्सने तरुणावर लगेच कायदेशीर कारवाई करुन त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man sets bike on fire with lighter at petrol pump in anger viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: आई-वडिलांच्या लग्नाचा व्हिडिओ पाहून मुलांचा नागिण डान्स, हसून व्हाल वेडे!
1

Viral Video: आई-वडिलांच्या लग्नाचा व्हिडिओ पाहून मुलांचा नागिण डान्स, हसून व्हाल वेडे!

Video Viral : मुंबई लोकलमध्ये नेमकं काय घडलं? भरगच्च रेल्वेत दोन जण भिडले, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Video Viral : मुंबई लोकलमध्ये नेमकं काय घडलं? भरगच्च रेल्वेत दोन जण भिडले, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 1000 लोक गेले वाहून; 30 पोलीस बेपत्ता; भयानक VIDEO VIRAL
3

Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 1000 लोक गेले वाहून; 30 पोलीस बेपत्ता; भयानक VIDEO VIRAL

रील्सच्या नादात क्रूरतेची हद्द ओलांडली! डॉल्फिनला सायकलला बांधून बनवला VIDEO; नेटकरी भडकले, कारवाईची मागणी
4

रील्सच्या नादात क्रूरतेची हद्द ओलांडली! डॉल्फिनला सायकलला बांधून बनवला VIDEO; नेटकरी भडकले, कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.