
रास्ता ओलांडताना भरधाव कारने दिली धडक, तरुणी हवेत उडत रस्त्यावर येऊन आदळली, थरारक अपघाताचा Video Viral
मागील काही काळापासून रस्ते अपघाताचे प्रमाण फार वाढत चालले आहे. रस्त्याने गाडी चालताना किंवा रस्ता ओलांडताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला वारंवार दिला जातो मात्र बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि मग गंभीर अपघाताला बळी पडतात. बऱ्याचदा आपली एक शुल्लक चूक आपल्या जीवावर बेतू शकते अशात प्रत्येक वेळी आपल्या जीवाची खबरदारी घेणे फार गरजेचे असते. सोशल मीडियावर अनेकदा अपघातांचे काही व्हिडिओज शेअर केले जात असतात. सध्या आशाच एका थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर आणखीन एका अपघाताच्या व्हिडिओची नोंद झाली आहे. यात एक तरुणी रास्ता क्रॉस करताना तिला एका भरधाव कारने जोरदार धडक दिल्याचे दिसून येत आहे. यावेळी तरुणीचे लक्ष आपल्या मोबाईलकडे असते तिने रस्त्यावरील रेड सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि रस्त्यावर चालू लागली ज्यामुळे रस्ता ओलांडत असताना तिला समोरून येणारी गाडी दिसत नाही आणि तिचा अपघात होतो. ही धडक इतकी गंभीर आणि थरारक असते की याचा व्हिडिओ पाहून आता अनेक युजर्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी रस्त्यावरून चालताना तिच्या मोबाइलमध्ये इतकी गुंग झाली आहे की, रस्त्यावरील रेड सिग्नलकडे ती दुर्लक्ष करते आणि रस्ता ओलांडू लागते. इतक्यात सिग्नल ग्रीन झाल्याने वेगाने येणारी कार तरुणीला जोरदार धडक देते. या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर जोरदार आदळली जाते. यावेळी तिच्या हातातील मोबाइलदेखील दूर फेकला जातो. या घटनेनंतर कारचालकाने कार थांबवली आणि तिला गंभीर दुखापत झाली नाही ना हे पाहण्यासाठी पटकन कारमधून बाहेर आला. इतक्यात तरुणी कशीबशी उठते आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. विशेष म्हणज, इतक्या जोरदार धडकेनंतरही तरुणीचे प्राण वाचते आणि सुखरूप या अपघातातून बाहेर पडते.
knocked the sonic coins right out of her 😳 pic.twitter.com/KNMmriQbMn — OnlyBangers (@OnlyBangersEth) November 13, 2024
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अपघाताचा व्हायरल व्हिडिओ @OnlyBangersEth नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 50 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “फोनवर असताना या पिढीकडे जगण्याचे कौशल्य नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही सर्वस्वी तिची मूर्खपणाची चूक होती…”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.