Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

फरीदाबादमधील सूरजकुंड मेळ्यात सुनामी पाळणा कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला असून १३ पर्यटक जखमी झाले आहेत. आयोजकांच्या हलगर्जीपणावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 07, 2026 | 09:34 PM
सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला (Photo Credit- X)

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना!
  • फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी
  • पाहा काळीज धडधडवणारा Video
Sunami Ride Collapses at Surajkund Fair: हरियाणातील फरीदाबाद येथे सुरू असलेल्या जगप्रसिद्ध सूरजकुंड मेळ्यात शनिवारी संध्याकाळी काळीज धडधडवणारी घटना घडली. मेळ्यातील ‘सुनामी’ नावाचा मोठा पाळणा अचानक कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस निरीक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य १३ जण जखमी झाले आहेत.

बचावकार्य करताना ‘खाकी’चा अंत

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी संध्याकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास घडला. पाळणा कोसळल्याने समजताच मदतकार्यासाठी धावलेले पलवल येथे तैनात असलेले पोलीस निरीक्षक जगदीश प्रसाद यांचा बचावकार्यादरम्यान गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. या अपघातात अन्य अर्धा डझन लोकही जखमी झाले असून त्यात काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची शक्यता आहे.

फरीदाबाद सूरजकुंड मेले में हुआ हादसा अत्यंत दुखद है। विश्वस्तरीय आयोजन में सरकार की तरफ़ से ऐसी घोर लापरवाही अक्षम्य है। हादसे में कई लोगों के घायल होने व पुलिसकर्मी की मृत्यु की दुखद सूचना मिल रही है। भगवान से घायलों के स्वास्थ्य लाभ के लिए प्रार्थना और मृतक के परिवार के… pic.twitter.com/s89AGRmh2t — Anurag Dhanda (@anuragdhanda) February 7, 2026
फरीदाबाद के सूरजकुंड में मेला चल रहा था। जिसमें ये झूला लगा था झूले में 18 लोग सवार थे। ऊपर जाकर झूला फंस गया। कुछ लोगों को नीचे उतारा गया। उसी वक्त झूला नीचे गिर गया। इंस्पेक्टर जगदीश की मौत हुई है, 13 लोग घायल हैं।#faridabad pic.twitter.com/KhoFr4qgoy — Parikshit Singh Adv (@iParikshitRana) February 7, 2026

प्रशासनाकडून अधिकृत माहिती

जिल्हा उपायुक्त (DC) आयुष सिंह यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, “या दुर्घटनेत एकूण १३ लोक जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.” घटनेनंतर जिल्हा उपायुक्त, पर्यटन विभागाचे एमडी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या संपूर्ण परिसराची बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.

धक्कादायक! हॉटेलमध्ये अ‍ॅडल्ट फिल्म लावली आणि अचानक दिसला स्वतःचाच गर्लफ्रेंडसोबतचा Video, पायाखालची जमीन सरकली

एकाच दिवशी दोन अपघात; आयोजक पिंजऱ्यात

शनिवारी सूरजकुंड मेळ्यात एकामागून एक दोन अपघात घडले, ज्यामुळे आयोजकांच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे: पहिली घटना फूड कोर्टमध्ये जोराच्या वाऱ्यामुळे मुख्य गेट कोसळले, ज्यात दोन जण जखमी झाले. तर, दुसरी घटना: ‘सुनामी’ पाळणा कोसळला, ज्याने संपूर्ण मेळा हादरवून टाकला.

मेळ्यात घबराटीचे वातावरण

ज्यावेळी हा अपघात घडला, तेव्हा मेळ्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. पाळणा कोसळताच परिसरात प्रचंड अफरातफर माजली आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने बचाव पथके तैनात केली आहेत.

दोषींवर कडक कारवाईचे आदेश

पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मेळा समिती आणि झुल्यांच्या संचालकांनी सुरक्षेचे नियम पाळले होते की नाही, याची तपासणी केली जात आहे. “या दुर्घटनेत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सैनी यांनी दुःख केले व्यक्त

मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “फरिदाबादमधील सूरजकुंड मेळ्यादरम्यान झालेल्या अपघातामुळे मला खूप दुःख झाले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींवर योग्य आणि तात्काळ उपचार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. जखमींना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हरियाणा सरकार पूर्ण तत्परतेने आणि संवेदनशीलतेने काम करत आहे.”

अन् देवदूत बनला पोलिस! तरुणाने रेल्वे ट्रॅकवर उडी मारली इतक्यात ट्रेन आली अन्…; VIDEO पाहून उडेल थरकाप, Video Viral

Web Title: A terrible accident at the surajkund fair the ferris wheel suddenly collapsed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • faridabad
  • Haryana
  • viral video

संबंधित बातम्या

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
1

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
3

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
4

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.