
Social Media Viral Videos
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हा प्रकार घडला आहे. एका तरुणाने त्याच्या पांढऱ्या रंगाच्या कारवर लाल रंगाच्या लिपस्टिकचे तब्बल 3,400 ‘किस मार्क्स’ (लिपस्टिकचे ठसे) उमटवले. या ‘किसिंग कार’ची व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.#Gwalior #MadhyaPradesh #KissingCar #SwiftCar pic.twitter.com/ZNtUUHfcvu — SakalMedia (@SakalMediaNews) August 25, 2026
फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल
हा कार किसिंगवाला व्हिडिओ तर पाहिलात, आता हा व्हिडिओ बघा. आहे ना भावाला कोणी टक्कर द्यायला? काय साला लोक करतील, त्याचा नेम नाही. चक्क तेलाने स्वतःला अंघोळ करून घेतली आहे. दादा सरळ तेलाच्या टँकमध्ये उतरायला. पण खरं तर हे चित्र बघायला फार चांगलं नाही. जर हे खाद्य तेल असेल तर आरोग्याचा प्रश्न येतो. मी तर सांगेन, हा सापडला तर धुरी द्या त्याला.
जिथे माणसं सेल्फीशिवाय राहू शकत नाहीत, तर प्राण्यांचं काय घेऊन बसलात? हा व्हिडिओ पाहिलात तर नक्कीच कल्पना येईल, सेल्फी किती महत्त्वाची आहे.एक माणूस सेल्फी घेताना माकडाला मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं. भाई चक्क बाऊट देताना पोझ देतोय. मस्त पोझ देऊन सेल्फी काढतोय माकड बुवा!हे सगळं वानर दादा सुद्धा बघती कुठून तरी त्यालाही कळलं कि मोबाईल किती महत्वाचा आहे. पुढे जर तुम्हाला रस्त्यात इतर प्राणीही सेल्फी काढताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको.
Watch | A monkey addicted to reels short videos.
Viral video is from Vrindavan in North India. pic.twitter.com/kGgs2rhI1i — DeshGujarat (@DeshGujarat) August 24, 2026
असे खूप व्हायरल व्हिडिओ ट्रेंडिंग होत आहेत. त्यापैकी हे जरा हटके व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्हाला नक्कीच आवडले असतील.