
तामिळनाडूमध्ये एका तरुणाने बांधले एलियनचे मंदिर
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. यात व्हायरल झालेल्या गोष्टी कधी आपल्याला खळखळून हसवतात तर काही अचंबित करून जातात. काही गोष्टी तर अशा असतात, ज्यांचा आपण कधी विचारही केला नसावा. सध्या अशीच एक गोष्ट तुफान व्हायरल झाली आहे. याबद्दल ऐकूनच तुम्हाला गरगरायला लागेल. सध्या एक विचित्र बातमी समोर आली आहे, जिचा कधी स्वप्नातही विचार केला नसावा.
ही बातमी तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील आहे. येथे मल्लमुपंबत्ती येथे राहणारा लोगनाथन आपल्या गावात एलियनचे मंदिर बांधत आहे. एलियनविषयी आपण अनेक गोष्टी ऐकल्या असाव्यात मात्र एलियनचे मंदिर बांधल्याचे प्रथमच ऐकले आहे. मंदिर बांधणाऱ्या लोगनाथनचे म्हणणे आहे की, जगात नैसर्गिक आपत्ती सतत वाढत आहेत. या संकटांना थांबवण्याची ताकद केवळ एलियनमध्ये आहे. म्हणून त्याने एलियनचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. लोगनाथन या मंदिरात दररोज एलियनची पूजा करतात. या मंदिराच्या उभारणीचे काम अजूनही सुरू असून, ते काही महिन्यांत पूर्ण होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, या मंदिराचे बांधकाम 2021 पासून सुरु आहे. हे मंदिर लोगनाथनचे गुरु सिद्ध भाग्य यांच्या जीवनसमाधीजवळ बांधण्यात येत आहे. लोगनाथन म्हणाले की, परग्रहवासीयांसाठी आजपर्यंत कुठेही मंदिर बांधलेले गेले नाही आहे. त्यामुळे या मंदिराच्या दर्शनासाठी दूरदूरहून लोक येत असतात.एवढेच काय तर त्याने असाही दावा केला आहे की, तो चक्क एलियनशी संवाद साधतो. त्याने याआधीच एलियन्सशी बोलून हे मंदिर बांधण्याची परवानगी मिळवली असल्याचे त्याने सांगितले आहे. हे मंदिर बांधल्याने एलियन्स आपल्या इच्छा पूर्ण करतील, असा त्याला विश्वास आहे. त्याचे हे दावे ऐकून आता सर्वजण आवाक् झाले आहेत.
हेदेखील वाचा – समुद्राच्या आत दडलंय ‘पाताळ लोक’! अशा गोष्टी मिळाल्या की… पाहूनच थरकाप होऊ लागेल
दरम्यान सुमारे तीन-चतुर्थांश एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या मंदिरात एलियन्सशिवाय भगवान शिव, माता पार्वती, माता काली आणि भगवान मुरुगन यांसारख्या देवतांच्या मूर्तीही बसवण्यात आल्या आहेत. याचा एक व्हिडिओ X अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.