या विश्वात अशा किती गोष्टी आहेत, ज्यांचे रहस्य आजवर उलगडलेले नाही. यातीलच एक आहे पाताळ लोक. तुम्ही अनेकदा याविषयी ऐकले असेल मात्र हे पाताळ लोक खरेच अस्तित्वात आहे का? याचा खुलासा आजवर कोणीही करू शकल नाही. मात्र आता याबाबत एक नवीनच खुलासा करण्यात आला आहे. इतिहासात अशा कितीतरी गोष्टी घडल्या ज्या आपल्याला ठाऊक नाहीत. जेव्हा या गोष्टी कोणत्याही रूपात आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला समजते की आपल्या डोळ्यांपासून लपलेले एक अनोखे जगदेखील असू शकते. असेच एक जग नेपल्सच्या आखातीमध्ये समोर आले आहे, जिथे समुद्राच्या आत अशा गोष्टी सापडल्या ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.
आता संपूर्ण समुद्राच्या आत खोल पाण्यात एक 2000 वर्ष जुने शहर सापडले आहे. हे पाहून गोताखोरांनाही (Divers) आश्चर्य वाटले कारण समुद्राखालच्या वस्तू कोणत्या तरी आलिशान जागेशी जोडल्या गेल्या आहेत. हे खरोखर काही अंडरवर्ल्डसारखे आहे, ज्यामध्ये अनेक रहस्ये लपलेली आहेत.
द सनच्या रिपोर्टनुसार, समुद्राखाली सापडलेल्या जगात 177 हेक्टरचे एक जलमग्न शहर आहे, जे सुमारे 2000 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. तथापि, वेळेनुसार याची स्थिती बरीच चांगली आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर यथे फार मोठमोठे पुतळे दिसून आले. समुद्राच्या 20 फूट खाली पृष्ठभागावर एक सुंदर संगमरवरी मजला आहे, ज्याला विलाचा रोसेप्शन मानले जाते. फ्लेग्रेन फील्ड्सच्या पुरातत्व उद्यानानुसार (Archaeological Park of the Phlegraean Fields), हे शहर तिसऱ्या शतकातील असल्याचे मानले जाते, ज्याचे नाव बाईया असे म्हटले जात आहे.

हेदेखील वाचा – जमिनीचे खोदकाम करताना आढळली इजिप्तशियन ममी! भयानक रूप अन् 3500 वर्षांपूर्वीचे सत्य जाणून शास्त्रज्ञांना बसला धक्का

असे मानले जात आहे की, श्रीमंत लोक इथे प्रायवेट सहलीसाठी येत असावेत. हे एक फॅशनेबल समुद्री रिसॉर्ट असावे, ज्याभोवती फक्त रोमचे सर्वात श्रीमंत लोक भेटायला आले असतील. ज्युलियस सीझर, क्लियोपात्रा, सिसेरा आणि हॅड्रियन यांसारख्या प्रसिद्ध लोकांनीही या शहराला भेट दिली आहे. जॉन स्माउट नावाच्या संशोधकाचा असा दावा आहे की, क्लियोपाट्रानेही या ठिकाणी भेट दिली असावी. कालांतराने, हे शहर हायड्रोथर्मल आणि भूकंपीय ऍक्टिव्हिटीजमुळे पाण्यात बुडाले.






