थायलंडमधील एका महिलेला वटवाघळाचं सूप प्यायल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिलेने सूप पितानाचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला. तसेच या प्रकरणी महिला शिक्षिका असणाऱ्या या महिलेला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. यासोबतच £12,000 इतका दंडही भरावा लागेल.
महिलेने मसालेदार सूपच्या भांड्यात उकळलेल्या वटवाघुळांचे वर्णन “स्वादिष्ट” असे केले. तिने पुढे बोलताना सांगितले की, वटवाघूळाच्या नखांना उंदरासारखा वास येत होता आणि त्याची त्वचा चिकट झाली होती. तिने व्हिडिओमघध्ये लोकांना सांगितले की, ती कोणत्याही कोरोनाव्हायरस पसरवण्याचा प्रयत्न करत नाही. कारण तिच्या परिसरात राहणाऱ्या इतर लोकांनीही वटवाघुळ खाल्लेले होते.
अनेक यूजर्संनी व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंन्ट केल्या आहेत. तसेच नवीन रोगांचा प्रसार होण्याचा धोकाही वर्तवला आहे. एका युजरने म्हटले की, “जर तुम्ही मरणार असाल तर एकटेच मरा.