हर कुत्ते का दिन आता है! श्वानाने केली महाकाय मगरीची शिकार, क्षणार्धात फाडला जबडा अन् थरारक शिकारीचा Video Viral
धोकादायक प्राण्यांपैकीच एक मगर हा प्राणी आहे. मगर आपल्या थरारक शिकारीसाठी ओळखली जाते. तिचा एक वार समोरच्याला मृत्यूच्या दारी पोहचवते. फार चपळतेने आणि सराईतपणे मगर आपल्या शिकारीवर हल्ला चढवते. मगरीची शिकार इतकी थरारक असते की, वेळ पडली तर ती सिंहालाही सोडत नाही. मगरीला पाण्याचा राक्षस असेही संबोधले जाते. या डेडली प्राण्याच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर याआधीही शेअर झाले आहेत मात्र सध्या जो व्हिडिओ शेअर झाला आहे तो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओत नक्की काय घडलेय? चला जाणून घेऊयात .
सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे बरेच व्हिडिओज शेअर झाले आहेत. मात्र सध्याचा व्हिडिओ तुम्हाला थक्क करून टाकेल. यात मगरीने कोणत्या प्राण्याची नव्हे तर चक्क मगरीचीची शिकार केल्याचे दिसून आले आहे, तेही कुणी तर एका श्वानाने… मुळातच मगरीला धोकादायक प्राण्यांपैकी एक मानले जाते आणि दुसरीकडे कुत्र्याला प्रामाणिक आणि राखणदार अशा उपमा दिल्या जतात. कुत्रा एक पाळीव प्राणी आहे. अशात एका सध्या सुध्या प्राण्याने पाण्यातील राक्षसाची शिकार करणे काही सोपी आणि सामान्य गोष्ट नाही. ही अनोखी शिकार पाहून आता सोशल मीडिया युजर्स आवाक् झाले आहेत.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मगर तलावात शिकाऱ्याची वाट पाहत बसली आहे. मात्र तिला काय माहिती की, काही वेळात तिचीच शिकार होणार आहे. आपण पाहू शकता की, तलावात मगर कोणताही विचार न करता मुक्तपणे पोहत आहे, यावेळी एक कुत्रा आपल्याला तलावाच्या काठाशी उभा दिसतो. तितक्यात मागून एक कुत्रा अचानक मगरीवर हल्ला करतो आणि खेचत तिला तलावाच्या बाहेर किनाऱ्यावर घेऊन होते. इथे दुसरा कुत्रा मगरीवर निशाणा साधून बसलेला असतो. मगरीला पाहताच दुसरा कुत्राही त्याला खेचत तलावाबाहेर काढतो आणि दोन्ही कुत्रे मिळून मगरीचा फरशा पाडतात. श्वानांनी मगरीची केलेली ही शिकार पाहून आता अनेकजण अचंबित झाले आहेत. ‘हर कुत्ते का दिन आता है’ या म्हणींचे एक उत्तम उदाहरण या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळाले.
वीडियो तो पता नहीं कब और कहाँ का है लेकिन वायरल है। दो कुत्तों ने मिलकर मगरमच्छ को मार गिराया, शिकार करने के लिए पानी में कूदे और खींचकर बाहर किनारे पर लेकर आए।#crocodile #dogshuntcrocodile pic.twitter.com/rIQo3C6RtU
— Ajit Singh Rathi (@AjitSinghRathi) November 29, 2024
या धक्कादायक शिकारीचा व्हिडिओ @AjitSinghRathi नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे माहीत नाही पण व्हायरल झाला आहे. दोन कुत्र्यांनी मिळून मगरीला ठार मारले, शिकारीसाठी पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले’ असे लिहिले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले. यात एका युजरने लिहिले आहे, “ही मगर नाही, तर मोठा सरडा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नीट पाहा ती मगर नाही आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.