
guy create world record by putting matchsticks in nose video viral
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नाकामध्ये माचिसच्या काड्या घालताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, हा व्यक्ती नाकपुडीत एक-एक करुन माचिसेच्या काड्या घालत आहे. असे करत तरुण दोन्ही नाकपुडीत माचिसच्या काड्या घालतो. याला वर्ल्ड रेकॉर्ड असे म्हणण्ठात आले आहे. परंतु यामुळे पठ्ठ्याचा जीव जाण्याचीही शक्यता आहे. काड्यांनी दोन्ही नाकपुडी बंदी झाल्या असून यामुळे त्याचा श्वास अडकून त्याचा जीवही जाऊ शकतो. या व्यक्तीचे नाव मार्टिन स्ट्रोबी असून हा स्वीडनचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, मार्टिनच्या मते त्याची दोन्हबी मुले सतत या पुस्तरकाची पाने उसटत असतात. यावेळीच त्यांना यामध्ये त्यांचे नाव असण्याची इच्छा झाली. यासाठी त्यांनी नाकात माचिसच्या जास्तीत जास्त काड्या घालण्याचे ठरवले. यावेळी त्यांना वाटले नव्हते की ते विक्म मोडू शकतील.
वाह क्या जुगाड है! भाजी घुटण्यासाठी पठ्ठ्याने थेट वापरली ड्रिल मशिन; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @guinnessworldrecords शेअर केला आहे. या व्हिडिओला १० लाखाहून अधिक व्ह्यूज आणि १५ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. काही लोक असे कृत्य जीवासाठी धोकादायक ठरु शकते असे म्हटले आहे, तर काहींनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने चुकून याचे पाहून मुलांनी असे काही केलं तर त्यांचा जीव जायचा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने लायटर इमोजी टाकत पेटवून द्या असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.