
जत्रेतील अनोखं दृश्य! झोप ऐकेना, वडिलांनाही सोडवेना... चिमुकल्याने बापाच्या पायाला बिलगुनच घेतली वामकुक्षी; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
जत्रेतील या दृश्यांंमध्ये चिमुकल्याचे वडिला आपल्या कमरेला एक टोकरी लावून उभे असल्याचे दिसते. या टोकरीत खेळण्याच्या बंदुका असतात ज्यांना विकण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. यावेळी आपल्याला त्यांचा लहान मुलगा खाली पायाला बिलगुणच शांत झोप घेत असल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये कोणताही संवाद नाही, अश्रू नाहीत पण तरीही यातील प्रत्येक दृश्य मनाला भिडणारे ठरते. व्हिडिओत व्यक्तीच्या बाजूला आणखी एक मुलगा उभा असल्याचे दिसते जो क्वचित त्याचा दुसरा मुलगा असावा. जत्रेच्या रोषनाईत आपला आनंद बाजूला सारत मुलं वडिलांच्या मदतील अधिक प्राधान्य देतात जे दाखवून देते की, गरीबी लहाणपणातच आपल्याला मोठं करुन जाते. ही असंख्य कष्टाळू वडिलांची कहाणी आहे ज्यांचे प्रेम आवाज करत नाही, तर त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करते.
व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने या घटनेवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मदत केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड केला असता तर बरे झाले असते.. जर तुम्ही फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी हे करत असाल तर ते खूप चुकीचे आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो किती शांत झोपला आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “गरिबी फार वाईट असते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.