कैलास पर्वतावर ड्रोन उडवताच कॅमेरात कैद झाले अद्भुत दृश्य; स्वप्नातही विचार केला नसेल असा नजारा, 1 मिलियन व्युज अन् Video Viral
भगवान शिवाला प्रिय असणारे आणि त्यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाणारा कैलास पर्वत पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखला जातो. हा हिमालयातील एक पवित्र पर्वत आहे, जो तिबेटमध्ये आहे. हिंदू, बौद्ध, जैन आणि बॉन धर्माचे लोक त्याला अत्यंत पवित्र मानतात. या पर्वताचा आकार हिऱ्यासारखा असून त्याची उंची ६,६३८ मीटर (२१,७७८ फूट) आहे. कैलास पर्वतावरून सिंधू, ब्रह्मपुत्रा, सतलज आणि घाघरा या नद्यांचे उगमस्थान आहे. कैलास पर्वतावर चढाई करण्यास बंदी आहे, कारण इथे एक अलौकिक शक्ती आहे ज्यामुळे याची चढाई करता येत नाही अशी मान्यता आहे. अशातच कैलास पर्वताला एक ड्रोनने कॅप्चर करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यात पर्वतावरील सुंदर आणि अद्भुत दृश्य दिसून आले जे आजवर कुणीही पाहिले नसेल.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहू शकता, यात तुम्हाला एक व्यक्ती कैलास पर्वतापासून खूप दूर उभी असलेली दिसेल. कैलास पर्वत बर्फाच्या चादरीने झाकलेला आहे. यानंतर तो व्यक्ती हवेत आपला ड्रोन उडवतो जो गोळीच्या वेगाने पर्वताकडे जाऊ लागतो. फ्रेमच्या सुरुवातीलाच हे दृश्य आश्चर्यकारक आणि सुंदर दृश्यांनी भरलेले दिसून येते. यामध्ये तुम्हाला दिसेल की कधीकधी ड्रोन वेग वाढवतो तर कधीकधी हळू चालतो. पण शेवटी, ड्रोन पर्वताच्या जवळ पोहोचताच, एक मनमोहक आणि शांत दृश्य दिसू लागते जे सर्वांनाच खुश करते.
यामध्ये तुम्हाला दिसेल की भगवान शिवाच्या पर्वतावर सर्वत्र फक्त बर्फ दिसतो. ड्रोन अखेर पर्वताच्या सर्वात उंच शिखरावर पोहोचतो, जिथून संपूर्ण जगाची भूमी दिसल्यासारखे वाटते. फ्रेममध्ये हे इतके अद्भुत दृश्य आहे की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटेल. कैलास पर्वताशी संबंधित हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आता चांगलाच व्हायरल होत आहे, लोक व्हिडिओला वेगाने शेअर करत या व्हिडिओची मनसोक्त मजा लुटत आहेत.
कैलाश पर्वत पर ड्रोन गया मगर शंकर जी नहीं दिखाई दिया !! pic.twitter.com/BbvgrtNHQ2
— Amit Yadav (Journalist) (@amityadavbharat) September 10, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @amityadavbharat नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे ‘ड्रोन कैलास पर्वतावर गेला पण शंकरजी दिसत नव्हते’ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अस्वलाचे वेडेपणा शिगेला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अस्वल लगेच हल्ला करायला निघाला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो स्वतःलाच घाबरला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.