Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेच काय ते कलियुग! 80 वर्षांच्या आईला बस स्टॉपवर सोडून मुलगा गेला पळून, ती रडत राहिली अन् भावनिक Video Viral

Heart Touching Video : कलियुगातला हा शिक्षक जो स्वतःच्याच आईला बसस्टॉपवर सोडून निघून जातो... घटनेचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात वृद्ध महिला घाबरून रडत असल्याचे दिसून येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 08, 2026 | 11:20 AM
हेच काय ते कलियुग! 80 वर्षांच्या आईला बस स्टॉपवर सोडून मुलगा गेला पळून, ती रडत राहिली अन् भावनिक Video Viral

हेच काय ते कलियुग! 80 वर्षांच्या आईला बस स्टॉपवर सोडून मुलगा गेला पळून, ती रडत राहिली अन् भावनिक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मध्य प्रदेशातील मंदसौर येथील व्हिडिओत सुमारे ८० वर्षांच्या वृद्ध महिलेला तिच्या स्वतःच्या मुलाने बस स्टॉपवर सोडून दिल्याचे समोर आले आहे.
  • एकटी, घाबरलेली आणि रडणारी ही महिला मुलीच्या घरी जायची इच्छा व्यक्त करत असून तिच्या चेहऱ्यावर भीती आणि एकटेपणा स्पष्ट दिसतो.
  • व्हिडिओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त करत महिलेला मदत करण्याची इच्छा दर्शवली आहे.
सोशल मिडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. अशात अलिकडेच एक अनोखा आणि भावनिक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात कलियुगातील एका मुलाच्या काळ्या कर्मांचे सत्य समोर आले. धार्मिक मान्यतेनुसार, सध्या कलियुग सुरु असून हे चार युगांमधील सर्वात वाईट युग मानले जाते. व्हिडिओमध्ये एक असहाय्य आणि निराधार वृद्ध महिला रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील मंदसौर येथील असल्याचे सांगितले जात आहे. तो पाहिल्यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी आले आणि तर काहींना राग अनावर झाला. सांगण्यात येत आहे की, या वृद्ध महिलेला तिच्या मुलाने बस स्टॉपवर सोडून तो तिथून निघून गेला.

आश्चर्यच! जीव वाचवण्यासाठी जंगलाचा राजा पळाला आणि थेट झाडावरच जाऊन बसला… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

काय आहे प्रकरण?

या व्हायरल व्हिडिओमध्ये, तुम्हाला सुमारे ८० वर्षांची एक वृद्ध महिला बस स्टॉपवर एकटी रडताना दिसत आहे. जेव्हा रस्त्याने जाणाऱ्यांनी वृद्ध महिलेला तिच्या रडण्याचे कारण विचारले तेव्हा वृद्ध महिलेने जे सांगितले ते ऐकून सर्वांचेच हृदय कोलमडले. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की व्हिडिओ बनवणारा व्यक्ती म्हणत आहे की या वृद्ध महिलेला तिच्या मुलाने बस स्टॉपवर सोडले होते आणि तो तिथून पळून गेला होता. वृद्ध महिलेचा मुलगा व्यवसायाने शिक्षक आहे परंतु त्याने त्याच्या आईला कुटुंबातून काढून टाकले आणि तिला बस स्टॉपवर सोडून दिले.

ती महिला म्हणत असल्याचे दिसते की तिला तिच्या मुलीच्या घरी जायचे आहे. तथापि, तिच्या चेहऱ्यावर भीती, एकटेपणा आणि असहाय्यता स्पष्टपणे दिसून येते. या वयात, जेव्हा तिला आधाराची आवश्यकता असते, तेव्हा तिला स्वतःचा मार्ग शोधण्यास भाग पाडण्यात आले आहे आणि तेही तिच्या पोटच्या मुलाकडून… मुलाचे हे कृत्य अनेकांना आता राग अनावर करत असून महिलेच्या अवस्थेने सर्वांनाच भावूक केला. घटनेचा व्हिडिओ @WokePandemic नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Elderly Mother aged 80 Abandoned at Bus Stand in Mandsaur by son after pressure from his wife The idea of family losing its meaning?
Are aging parents become inconvenient liabilities in their own homes?
This incident is not an isolated case. It reflects a growing moral crisis… pic.twitter.com/Cjsemah4AE — Woke Eminent (@WokePandemic) February 4, 2026

अन् देवदूत बनला पोलिस! तरुणाने रेल्वे ट्रॅकवर उडी मारली इतक्यात ट्रेन आली अन्…; VIDEO पाहून उडेल थरकाप, Video Viral

व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी या महिलेशी संपर्क कसा साधू शकेन? मला तिला मदत करायची आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ हृदयद्रावक आणि लाजिरवाणे. पालक आपले संपूर्ण आयुष्य आपली काळजी घेण्यात घालवतात, आणि वृद्धापकाळात त्यांना सन्मानाची गरज असते, दुर्लक्षाची नाही. जर एखादा समाज आपल्या वृद्धांना ओझे मानत असेल, तर काहीतरी खूपच चुकीचे आहे. कुटुंबाने सर्वात दुर्बळांचे संरक्षण केले पाहिजे, त्यांना सोडून दिले नाही पाहिज”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man left his 80 years old mother on bus stop in mandsour madhya pradesh viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral
1

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral
2

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral
3

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
4

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.