यमराज काय सुट्टीवर आहे? चालू रस्त्यात तरुणाचा जीवघेणा स्टंट, क्षणार्धात बाइक झाली पलटी अन् थरारक घटनेचा Viral Video
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याबाबत काहीही सांगता येत नाही. दररोज इथे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात, जे पाहून बऱ्याचदा लोकांना थक्क व्हायला होते. यात काही जीवघेण्या स्टंट्सचाही समवेश असतो. तुम्ही देखील सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही तुमच्या फिडवर असे व्हिडिओज नक्कीच कधी ना कधी पाहिले असावेत. कधी भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होतो. याशिवाय बाइकवर धोकादायक स्टंट करणाऱ्या लोकांचे व्हिडिओही व्हायरल होतात. सध्या अशाच एका जीवघेण्या आणि थरारक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
काय आहे व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चालू रस्त्यावर भरधाव वेगाने बाइक चालवताना दिसत आहे. यावेळी तो एक आपल्या फेमस करण्यासाठी धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. वेगवान बाईक चालवताना कधी तो समोरचे चाक हवेत उचलतो तर कधी बाईक हलवू लागतो. तो हे अनेक वेळा करतो. कधी तो स्पीड ब्रेकरच्या साह्याने बाईक हवेत फेकतो तर कधी बाईकचे पुढचे चाक पूर्णपणे उचलून घेतल्यानंतर तो हँडल सोडून बाईक चालवायला लागतो. हा सर्व प्रकार पाहून कोणालाही धडकी भरेल.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
व्हिडिओतील हा थरार पाहता व्यक्तीचा जीव आता जाईल की काय असे वाटू लागते मात्र असे काहीच होत नाही. व्यक्ती बाइकला हवेत उडवूनही आपल्याला बरोबर बॅलन्स करतो. मात्र त्याचा हा स्टंट पाहून इतरांना धडकी भरते. हा सर्व प्रकार आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून लोकांना या व्हिडिओला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
यमराज़ छूटी पर हैं क्या…..?🤔👇. 🔄🔙 pic.twitter.com/0AVPRSSOMH
— ❣⍣Cute࿐ɢɪʀʟ 💔🥀 (@Cute_girl__29) December 2, 2024
जीवघेण्या स्टंटचा हा व्हिडिओ @Cute_girl__29 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘यमराज सुट्टीवर आहे का?’ असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत या स्टंटविषयीचे आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “लोक स्वतःचा जीव का धोक्यात टाकतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काय माहिती यमराज सोबत त्याचे उठण बसणं असेल”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आता या लोकांना काही झाले तर ते सरकारला दोष देतील”.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.