प्राणी आणि प्राण्यांचे जीवन याविषयी नेहमीच लोकांना एक वेगळे कुतूहल वाटतं असते. प्राण्यांच्या रोजच्या आयुष्याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जंगलातील निरनिराळे पक्षी, प्राणी, किटक असे सर्वांचेच व्हिडिओज मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. लोकांना असे व्हिडिओज पाहयला फार आवडतात. हे व्हिडिओज कधी लोकांचे मनोरंजन करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात शिकाऱ्याचीच शिकार झाल्याचे दिसून येत आहे. क्षणार्धात पलटलेला हा डाव आता अनेकांना अचंबित करत आहे.
आपल्या रंग बदलण्याच्या कलेमुळे सरड्याला ‘रंगबदलू गिरगीट’ असे नाव मिळाले. आपल्या या युनिक कलेचा वापर करत सरडा अनेक प्राण्यांची शिकार करतो. आपला रंग आजूबाजूच्या गोष्टींची मिळवून तो कीटकांवर हल्ला करतो आणि त्यांना आपला जेवण बनवतो. अशाच एका प्रयत्नात एक सरडा लहान नागतोड्याच्या शिकारीसाठी येतो मात्र हा नागतोडा भलताच कमालीचा निघतो, तो क्षणार्धातच असा काही डाव पलटवतो सरड्याला आपली हार पत्करावी लागते. आता हा नागतोडा सरड्यावर कसा भारी पडला ते व्हायरल व्हिडिओतून जाणून घेऊयात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे व्हिडीओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एका हिरवेगार झाडावरील दृश्ये दिसत आहेत. या झाडाच्या फांदीवर एक सरडा आणि नागतोडा आमनेसामने उभे आहेत. यात संघर्षापूर्वीची एक अनोखी शांतता जाणवू लागते. तितक्यात सरडा अचानक नागतोड्यावर जोरदार हल्ला करतो आणि त्याला आपल्या तोंडात पकडण्याचा प्रयत्न करतो मात्र इथेच लढतीचा रंजक पार्ट सुरु होतो. सरड्याने हल्ला करताच नागतोडा आपल्या हातांनी त्याचा जबडा जोरदार पकडतो आणि त्याच्या तोंडाचा जोरदार चावा घेतो. यावेळी सरडा दुःखाने कळवळत राहतो. पुढे सरडा काही करेल याआधीच नागतोडा तेथून निघून जातो. यांनतर सरड्याच्या तोंडातून रे रक्तस्त्राव होताना दिसून येतो. व्हिडिओतील हा सर्व प्रकार पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सरडा आणि नागतोड्यातील या संघर्षमय लढतीचा व्हिडिओ @untamed_safari नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भाऊ एका किड्यामुळे मेला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “फूड चेनची वाट लावून टाकली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काय सरडा बनणार रे तू”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.