सोशल मीडियावर अनेकदा लग्नाचे बरेच मजेदार व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात तर कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. यात बऱ्याचदा लग्नातील काही विचित्र गोष्टी देखील व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका लग्नातील अजब-गजब प्रकार सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनला आहे. यात लग्नाच्या वारातीतील पाहुण्यालाच गावकरण्यांनी विजेच्या खांब्याला बांधून मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र गावकऱ्यांनी असे का केले? आणि नक्की यावेळी काय घडलं? या सर्व बाबींविषयी चला सविस्तर जाणून घेऊयात.
नेमकं काय घडलं?
तर झालं असं की, उत्तर प्रदेशातील एका लग्नाच्या मिरवणुकीत एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असताना हरवला आणि देवरिया येथील घराचा दरवाजा त्या व्यक्तीने ठोठावला. बुधवारी रात्री गोरखपूर येथून निघालेली मिरवणूक देवरियाच्या तारकुलवा गावातील स्थानिक विवाह मंडपात पोहोचली तेव्हा त्या व्यक्तीचा रस्ता चुकला. लग्नाचा पाहुणा एकटाच भटकत गावातील एका घरात पोहोचला, ज्यामुळे लोकांना तो चोर असल्याचा संशय आला. त्याने दरवाजा ठोठवताच लोकांनी आरडाओरड करत आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो चोर आहे म्हणत सावध केले. खरंतर त्यांनी लग्नाच्या पाहुण्याला चोर समजले आणि भीतीने सर्वजण ओरडू लागले. या परिसरात नुकतीच एका दिवसापूर्वी झालेल्या चोरीमुळे हा गोंधळ उडाला असावा, असे सांगण्यात आले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, गावकऱ्यांनी वरातीतील पाहुण्याला एका विजेच्या खांब्याला दोरीने बांधल्याचे दिसून येते. त्यांनतर ही लोक काठीने त्याला मारहाण करू लागतात. गावकऱ्यांकडून या व्यक्तीला यावेळी बेदम मारहाण करण्यात येते. लग्नाच्या मिरवणुकीत रास्ता चुकलेल्या या पाहुण्याला गावकरी तुडव तुडव तुडवतात आणि मग नंतर त्यांना लक्षात येते की, ज्याला ते मारत आहेत तो खरंतर कोणताही चोर नाही. या घटनेदरम्यान हा व्यक्ती बराच जखमी झाला, ज्यामुळे त्याच्या जखमांवर उपचार करण्यात येते. यानंतर या व्यक्तीला त्याला शोधायला आलेल्या कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात येते. लग्नातील ही अजब-गजब घटना सध्या सोशल मीडियावर सध्या फार धुमाकूळ घालत आहे.
#देवरिया के पथरदेवा कस्बे में बुधवार रात गोरखपुर से आई एक बारात के दौरान, नशे की हालत में एक युवक रास्ता भटक गया। स्थानीय लोगों ने उसे चोर समझकर पकड़ लिया और बुरी तरह पीटा। @DeoriaPolice pic.twitter.com/lGkxrUT6QV
— UttarPradesh.ORG News (@WeUttarPradesh) November 30, 2024
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @WeUttarPradesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘देवरियाच्या पाथरदेव गावात बुधवारी रात्री गोरखपूरहून आलेल्या लग्नाच्या मिरवणुकीत दारूच्या नशेत एक तरुण रस्ता चुकला. स्थानिक लोकांनी तो चोर समजून त्याला पकडून बेदम मारहाण केली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “देशात माणुसकीची पातळी किती घसरत चालली आहे, हा देश आर्थिक संकटात सापडला आहे असे कोणी म्हणेल का?” व्हिडिओवर देवरिया पोलिसांनी देखील कमेंट्स करत लिहिले आहे की, “याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.