
भक्तीला शब्दांची गरज नसते! हत्ती झाला गणपतीच्या चरणी लीन, चक्क सोंडेने ताट उचलत केली आरती; अद्भुत Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका मंदिराच्या गाभाऱ्यात हत्ती गणेशाची आरती करताना दिसला. हत्तीने आपल्या सोंडेत आरतीचे ताट पकडलेले असते. हे ताट गोल गोल फिरवत तो मोठ्या भक्तिभावाने गणेशाची आरती करत असतो. भक्तीत तल्लीन झालेल्या हत्तीला पाहून आजूबाजूची लोकही थक्क झाली आणि लगेच सर्वांनी आपल्या फोनच्या कॅमेरात हे दृश्य कैद केले.
हिंदू धर्मात हत्तीला विशेष मान दिला जातो. पौराणिक कथेनुसार, जेव्हा शिवाने आपल्या त्रिशूळाने गणपतीचे डोके धडापासून वेगळे केले तेव्हा देवी पार्वती त्यांच्यावर नाराज झाल्या. यांनतर आपल्या गणांना आज्ञा दिली की, उत्तर दिशेकडे जाणारे जे पहिले प्राणी दिसेल त्याचे डोके मला आणून द्या. यावेळी हत्ती तिथून जात होता, त्यानंतर हत्तीचे शीर गणपतीला लावण्यात आले आणि गणेश पुन्हा जिवंत झाला. गणपतीला बुद्धीचा देवता मानलं जात. आजही गणेशाच्या प्रत्येक मूर्तीमध्ये त्याचे धड माणसाचे असले तरी शीर हे हत्तीचे असते.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे. अनेक युजर्सने या व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे,”गणपती बाप्पा मोरया” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे चांगलं नाही. हत्ती हे भक्तीपोटी नाही तर काय होईल या भीतीने करत आहे.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.