
आगीशी खेळणं तरुणीला महागात पडलं! तोंडातून निघू लागल्या ज्वाळा, लोकांनी मारून मारून विझवली आग; Video Viral
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे नेहमीच अनेक वेगवेगळे, थक्क करणारे आणि कधी आपल्याला हादरवून सोडणारे दृश्य शेअर केले जात असते. इथे अनेक असे दृश्य शेअर केले जातात ज्यांना पाहताच आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. अनेकजण काही नवीन करुन दाखवण्याच्या प्रयत्नात असं काही करतात ज्यात त्यांच्याच जीवाला धोका निर्माण होतो. बऱ्याचदा गोष्ट एवढी वाढते की, ती व्यक्तीच्या जीवावर बेतू लागते. अशीच एक घटना आता इंटरनेटवर व्हायरल झाली आहे ज्यात तरुणीने नके तो पराक्रम करत आपला जीव धोक्यात घातला, परिणामी तिला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते आपण सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आपल्या परिस्थितीचं भान राहणं किती महत्त्वाचं आहे ते शिकवतो. व्हिडिओमध्ये, एक तरुणी आपल्या हातात आगीची काठी घेऊन तोंडाजवळ आणते. तिला काहीतरी स्टंट करुन दाखवायचा असतो पण घडत काही भलतंच. आगीची काडी जवळ येताच तिचं तोंड पूर्णपणे जळू लागतं आणि तिला तीव्र वेदना होऊ लागतात. ती आपलं तोंडावर हात मारुन आग विझवण्याचा प्रयत्न करते. तिचा त्रास पाहून तिथे उपस्थित असलेली लोकही तिच्या तोंडावर हात मारत तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि अखेर त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरतो. व्हिडिओच्या शेवटी मुलीच्या तोंडाला लागलेली ही आग पूर्णपणे विझल्याचे दिसून येते. वेळीच आग विझल्यामुळे मुलीचा जीव वाचला अन्यथा मोठी दुखापत घडण्याची शक्यता होती.
आनंद इतका झाला की लोकांनी पोलीस अधिकाऱ्यालाही नाचवलं, कडेवर उचललं अन्… मजेदार Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @vincent_tran6395 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शाब्बास, ती एक बाई जिने तिला मदत केली, बाकी सगळे फक्त बघत होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिचा चेहरा ठीक आहे का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिला लवकर हॉस्पिटलमध्ये जायला हवे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.