
Friend Saves Youth from Train ( मित्राने तरुणाला रेल्वेखाली येण्यापासून वाचवले )
मुंबईतील विक्रोळी रेल्वे स्थानकावरील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरधाव लोकल ट्रेन समोरून येत असताना रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या तरुणाला त्याच्या मित्राने प्रसंगावधान राखत बाजूला खेचले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
व्हायरल व्हिडिओमधील माहितीनुसार, संबंधित तरुण रेल्वे रुळांवर जाऊन उभा राहिला होता. त्याचा मित्र त्याला वाचवण्यासाठी तातडीने धावला आणि लोकल जवळ येण्यापूर्वीच त्याला रुळांवरून बाजूला खेचले. मित्राच्या या धाडसी कृतीमुळे तरुणाचा जीव वाचल्याचे दिसत आहे.
मुंबई के विक्रोली स्टेशन के पास रेलवे ट्रैक पर हुई एक दिल दहला देने वाली घटना,चलती ट्रेन के नीचे आत्महत्या करने की कोशिश कर रहे अपने दोस्त की एक युवक ने जान बचाई।युवक को पहले ही आती हुई ट्रेन के रास्ते से खींचकर बचाया गयाथाबावजूद युवक ने दोबारा चलती ट्रेन के नीचे गया https://t.co/dZQv9Plj3k — Preeti Sompura (@sompura_preeti) November 7, 2026
मात्र, या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तरुणाला रुळांवरून बाजूला काढल्यानंतरही तो पुन्हा रेल्वे रुळांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
हा व्हिडिओ विक्रोळी रेल्वे स्थानकावरील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या घटनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी कुर्ला रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे घटनेची वेळ, संबंधित तरुणांची ओळख आणि घटनेमागील नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अधिकृत पोलीस माहिती मिळाल्यानंतर या घटनेबाबत अधिक स्पष्टता येईल.
Ans: विक्रोळी रेल्वे स्थानकावर एक तरुण रेल्वे रुळांवर उभा असताना समोरून लोकल ट्रेन येत होती. त्याचवेळी त्याच्या मित्राने त्याला तातडीने बाजूला खेचले.
Ans: मित्राने प्रसंगावधान राखत त्याला रेल्वे रुळांवरून बाजूला खेचले. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.
Ans: होय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.