सोन साखळी लुटल्याची घटना ( कांदिवली )
ही संपूर्ण थरारक घटना 3 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 9.23 वाजता सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेता व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार हा आरोपी डिलीवरी बॅायच्या वेशात येऊन पत्ता विचारत होता. पिढीत वृद्ध महिले बरोबर बोलता बोलता त्याने सोनसाखळी खेचून फरार झाला. सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसून येते की, आरोपीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ जाऊन तिची सोन्याची साखळी हिसकावून घेतली आणि तो पळून गेला. या घटनेमुळे सोसायटीतील जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच इतर सुक्षिताना काय समजावे.
या आधीही सुद्धा दहिसर आणि बोरीवलीत अशाच पद्धतीने पत्ता विचारणे, लिफ्ट मागणे, किंवा मदत मागण्याच्या बहाण्याने जवळ येऊन चेन हिसकावण्याची घटना घडली होती.
Mumbai Chain Snatching: Elderly Woman Robbed in Kandivali A shocking incident has emerged from Kandivali West Mumbai, where an elderly woman was robbed inside her building corridor CCTV footage shows an unidentified suspect approaching the victim under the pretext of asking for an address, before allegedly snatching her gold chain and fleeing Local police are currently investigating the matter. — Ramesh Speaks (@rameshofficial0) November 6, 2026
ऑगस्ट 2026 मध्ये कांदिवली पूर्व येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्याची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली होती. ती घटना देखील CCTV मध्ये कैद झाली होती. तसेच मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2025-26 मध्ये मुंबईत दर महिन्याला सरासरी 25-30 सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असतात. यामध्ये कांदिवली, बोरिवली, मालाड या भागात चोरीचे सर्वात जास्त प्रमाण आहे.
मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातील घटनेचा मुंबई पोलीस तपास करत असून या घटने वरुन मुंबई असेल किंवा इतर सोसायटीतील माणसांनी आणि वृद्धांनी अधिक सर्तक राहणे गरजेचे आहे. याआधी सुद्धा कांदिवली मध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. ह्याच पॅटर्नचा वापर करुन सोनसाखळी चोरण्यात आली होती.
Ans: कांदिवली पश्चिम परिसरातील एका सोसायटीत घडली.
Ans: ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून २३ मिनिटांनी ही घटना घडली.
Ans: आरोपी डिलिव्हरी बॉयच्या वेशात आला. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेच्या जवळ जाऊन तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.






