
पोटाच्या आरपार झाली लोखंडी सळई, वाटलं जीव जातोय पण शेवटी उलगडलं फिल्मी सत्य... पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral
अनेक चित्रपटांमध्ये ॲक्शन सीन्स असले की, गोळी आरपार गेल्याचे किंवा चाकू शरीराच्या आरपार गेल्याचे बनावटी दृश्य दाखवले जाते. हे दृश्य तज्ञांच्या देखरेखीखाली चित्रित केली जातात जेणेकरून कोणालाही दुखापत होऊ नये. पण नक्की ते कसे तयार केले याची सामान्य प्रेक्षकांना कोणतीच माहिती नाही. चित्रपटात पाहताना हे दृश्य पाहायला फार थरारक वाटतात पण सत्यात अभिनेत्याला यात कोणतीही दुखापत होत नाही. इंटरनेटवर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात व्यक्तीच्या शरीरात एक लोखंडी सळई घुसल्याचे दिसते. ही सळई त्याच्या पोटाच्या आरपार घुसलेली असते पण खरंतर हे सत्य नसून हा फक्त डोळ्यांना पटवून देणारा भास आहे. व्यक्तीने खरंतर एक स्टंट करण्यासाठी हा सर्व प्रकार करुन दाखवला होता ज्याचा उलगडा व्हिडिओच्या शेवटी होतो. चला व्हिडिओत काय घडतं ते जाणून घेऊया.
एक झटका अन् माणूस क्षणातच हवेत झाला गायब, विजेच्या खांब्यावर लागली आग; भीषण अपघाताचा Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
तुम्ही चित्रपटांमध्ये असे दृश्ये पाहिली असतील, जिथे क्लायमॅक्समध्ये पात्रांना फायटिंगमध्ये रॉड आणि चाकू वापरताना दाखवले जाते. पण या व्हायरल रीलमध्ये, त्या माणसाने एक रहस्य उलगडले आहे जे हे चित्रपटातील दृश्ये कशी चित्रित केली जातात हे उघड करते. पोटात लोखंडी रॉड घातल्यानंतर, जेव्हा तो माणूस शेवटी तो काढतो तेव्हा हे स्पष्ट होते की काहीतरी वेगळेच घडत होते.
व्हिडिओची सुरुवातीला आपल्याला दिसेल की, एक मुलगा पोटात सळई घालून उभा आहे. कॅमेरा जवळ आल्यावर, त्याच्या पोटाजवळील सळई टोमॅटो सॉसने माखलेला असल्याचे स्पष्ट होते, जो तो माणूस रक्त म्हणून वापरत आहे. मग, कॅमेरा दूर जाताच, तो माणूस सळई पोटात गेल्यामुळे १४ सेकंद त्रास होत असल्याचे नाटकी कृत्य करतो आणि आपल्या शरीरातून ही सळई बाहेर काढतो. बाहेर काढताच हा एक प्रकारचा ढाचा आहे जो पोटाभोवती बसवल्यास सळई पोटाच्या आरपार झाल्यासारखे दिसते हे सत्य आपल्या समोर येते. हे दृश्य पाहून आता अनेकजण अचंबित झाले आहेत. काही क्षणासाठी सर्वांनाच हे दृश्य खरेखुरे वाटत होतो पण व्हिडिओच्या शेवटी मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का मिळाला.
हा व्हायरल व्हिडिओ @maximum_manthan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “क्षणभर कोणाला ते खरे वाटले?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “टोमॅटो केचप वाया घालवू नका” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मी हे सांगणारच होतो, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.