एसी व्हेंटमधून अचानक बाहेर आला साप अन्...;पुढे जे झाले ते पाहून उडेल थरकाप, व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा थरकाप उडवणारे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. सापांचे तर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. सापाला बघितल्यावर भल्या भल्यांचा थरकाप उडतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका विद्यालयातील अचानक एक साप आला ज्यामुळे अनेकांचा थरकाप उडाला.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ भयावह आहे. नोएडामधील एका विद्यापीठात लेक्चर दरम्यान एक साप घुसला. वर्गात अचानक सापाला पाहून विद्यार्थी आपल्या जागेवर चढले आणि त्यानंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर काही विद्यार्था घाबरून इकडे तिकडे पळू लागले. शिक्षकही घाबरले होते.
एसीमधून अचानक साप बाहेर येऊ लागला
व्हायरल होत असलेला व्हिडीओ नोएडामधील युनिव्हर्सिटीचा आहे. एका वर्गात सरांचे लेक्चर चालू होते. सगळे विद्यार्थी सरांचे म्हणणे ऐकत होते. अचानक वर्गातील एका एसीमधून अचानक एक साप बाहेर येऊ लागला. पहिल्यांदा एका विद्यार्थ्याच्या लक्षात येताच तो अचानक साप साप म्हणून ओरडू लागला. नंतर बाकीचे विद्यार्थी देखील घाबरून इकडे तिकडे पळू लागले. तर काही विद्यार्थी बॅंचवर चढून त्याचा व्हिडीओ काढू लागले. शिक्षकांचीही धांदल उडाली. सर्व विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून ते देखील त्यांना काय करावे ते लक्षात आले नाही.यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते.
व्हायरल व्हिडीओ
A snake made an unexpected appearance in a lecture hall at Amity University in Noida, leaving students in shock #Amity #AmityUniversity #AmityNoida #Noida pic.twitter.com/Xgadc0Fmgm
— Aaquil Jameel (@AaquilJameel) September 20, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AaquilJameel अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटीच्या लेक्चर हॉलमध्ये एका सापाने अनपेक्षितपणे एन्ट्री केल्याने विद्यार्थी हादरले’ असं कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये सगळेजण त्या सापाचे नंतर काय झाले विचारत आहेत. अनेकजण त्या सापाला मारू नका त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहाय्याने बाहेर कोठेतरी लांब सोडून द्या. तर काहींनी यांसारखे व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.