Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Bomb Threat : ‘बॉम्ब फुटणार आहे…’; विधानसभा, लाल किल्ला आणि दोन शाळांना उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Delhi Bomb Threat News: गेल्या काही दिवसांपासून बॉम्ब स्फोट धमकीचे सत्र पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा दिल्लीमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे राजधानीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 23, 2026 | 11:56 AM
'बॉम्ब फुटणार आहे...'; विधानसभा, लाल किल्ला आणि दोन शाळांना उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क (फोटो सौजन्य-Gemini)

'बॉम्ब फुटणार आहे...'; विधानसभा, लाल किल्ला आणि दोन शाळांना उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • विधानसभा, लाल किल्ला आणि दोन शाळांना उडवण्याची धमकी
  • सुरक्षा यंत्रणा सतर्क
  • ईमेलमध्ये स्पष्टपणे इशारा
Delhi Bomb Threat News In Marathi : दिल्लीमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्यांचा जोर अजूनही सुरूच आहे. ज्यामुळे राजधानीत भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (23 फेब्रुवारी) सकाळी दिल्ली विधानसभा आणि लाल किल्ल्याला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने संपूर्ण दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. धौला कुआं येथील आम पब्लिक स्कूलमध्ये सकाळी ७ वाजताच्या सुमारास धमकीचा ईमेल आला. ईमेलमध्ये स्पष्टपणे इशारा देण्यात आला होता की, सकाळी ९ वाजून ११ मिनिटाने या महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट केला जाणार आहे.

बॉम्ब स्फोटाची माहिती मिळताच, शाळा प्रशासनाने तात्काळ उत्तर जिल्हा पोलिसांना कळवले. या माहितीनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी विधानसभा आणि लाल किल्ल्याभोवतीचा परिसर तातडीने घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली. मात्र या शोध मोहिमेनंतर आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही ही दिलासादायक बाब आहे. अधिकारी या ईमेलच्या स्रोताचा शोध घेत आहेत की हा एक विनोद आहे की मोठा कट कोणी रचत आहे, याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही आठवड्यांत राजधानीतील अनेक संस्थांना मिळालेल्या या खोट्या कॉल्स आणि ईमेलमुळे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

ED Raids: ईडी’चा दणका! अनिल अंबानी समूहाच्या मालमत्तेसह १०,००० कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त

तीन शाळांना बॉम्बच्या धमक्या

यापूर्वी 19 फेब्रुवारीला 2026 रोजी सकाळी दिल्लीतील किमान तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. ज्यामुळे आपत्कालीन संस्थांना मुलांना ताबडतोब बाहेर काढण्यास आणि शोध मोहीम सुरू करण्यास भाग पाडले गेले. अधिकाऱ्यांनी सांगितले की हे धमक्या नंतर खोटे असल्याचे निश्चित झाले.

याप्रकरणी दिल्ली अग्निशमन सेवेच्या (DFS) अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला तीन शाळांना बॉम्बच्या धमक्याचे ईमेल पाठवल्याची माहिती मिळाली – द्वारका येथील CRPF पब्लिक स्कूल आणि सेंट थॉमस स्कूल आणि वेस्ट एन्क्लेव्हमधील DAV सेंटेनरी पब्लिक स्कूल. खबरदारीचा उपाय म्हणून, अग्निशमन दल आणि बचाव पथके ताबडतोब या ठिकाणी पाठवण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही.” अधिकाऱ्यांनी सांगितले की, इशारा मिळाल्यानंतर लगेचच, पोलिस पथके, बॉम्ब पथके, श्वान पथके आणि स्थानिक प्रशासन अधिकारी शाळांमध्ये पाठवण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून, शाळा प्रशासनाने शोध मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना परिसरातून बाहेर काढले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कसून तपासणी आणि शोधमोहिमेदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यांनी असेही सांगितले की संपूर्ण कॅम्पसची कसून तपासणी करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की सायबर टीमला सतर्क करण्यात आले आहे आणि ईमेलचा स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बिहारचा ‘बिहारी बाबू’ झाला इंग्लंडचा एआय मंत्री; 20 वर्षांनंतर मायदेशी परतल्यावर केले विकासाचे कौतुक

Web Title: Delhi assembly and red fort get bomb threat security agencies alert news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • Bomb threat
  • delhi
  • police

संबंधित बातम्या

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
1

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
2

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
3

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.