Viral video of 12-year-old boy sleeping on train tracks for reel in Odisha
अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचे लोकांना वेड लागले आहे. सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत चालले आहे. रोज अशा भयावह स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये तरुणांचा तर समावेश आहेच, परंतु आता लहान अल्पवयीन मुले देखील आपला जीव रीलसाठी धोक्यात घालत आहे. नुकतेच असाच एक जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक १२ वर्षाच्या मुलाने असे काही केले आहे की, यामुळे मोठी दुर्दैवी घटना घडली असती. सध्या या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशामध्ये ही भयावह घॉटना घडली आहे. रिल बनवण्यासाठी एक १२ वर्षांचा मुलगा पटरीवर जाऊन झोपला होता. याचा व्हिडिओ देखील त्याच्या मित्रांनी बनवला आहे. सध्या या मुलांविरोधात चौकशी सुरु आहे. सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक अल्पवयीन मुलगा रेल्वे पटीरवर बसलेला आहे. तो आपल्या मित्राला याचा व्हिडिओ बनवायला सांगत आहे. तसेच जोरजोरात हसत आता मज्जा येईल असे म्हणत आहे. याच वेळी एका दिशेने वाऱ्याच्या वेगाने एक ट्रेन येताना दिसत आहे. ट्रेन मुलापासून काही अंतरावर असताना मुलगा पटरीवर झोपतो. तुम्ही पाहू शकता की, ट्रेन त्याच्यावरुन जाता दिसत आहे. मुलगा तसाच झापलेला दिसत आहे. ट्रेन गेल्यानंतर मुलगा उठतो आणि कॅमेराकडे बघत आनंदाने उड्या मारत आहे. त्याने काहीतरी मोठे काम केल्यासारखे वागत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
రీల్స్ కోసం ప్రాణాలతో చెలగాటం
ఒడిశా – బౌద్ జిల్లాలోని పూరునాపానీలో రీల్స్ పిచ్చిలో ట్రైన్ పట్టాల మధ్య పడుకున్న బాలుడు
దానిని ఫోన్లో వీడియో తీసిన బాలుడి స్నేహితులు
ముగ్గురు మైనర్లను అదుపులోకి తీసుకొని విచారిస్తున్న అధికారులు pic.twitter.com/tf7N5I5kVo
— Telugu Scribe (@TeluguScribe) July 6, 2025
सध्या हा व्हिडिओ एक्सवर @TeluguScribe या अकाउंटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी आणि रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. तसेच संबंधित मुलांविरोधात कारवाई देखील केली आहे. रिल काढणाऱ्या आणि बनवणाऱ्या दोन्ही मुलांनाविरोधात बाल न्याय कायद्यांतर्गत पुढील कारवाई होणार असल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.