सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र विचित्र, कधी भयावह असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. तुम्ही दारु पिऊन गोंधळ करणाऱ्यांचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. दारुच्या नशेत व्यक्ती कधी काय करेल याचा नेम नाही. कधी कोण कुठे चढेल, कुठे झोपेल काय बोलेल सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका रिक्षाटालकाने दारुच्या नशेत असे काही केले आहे की यामुळे त्याचा जीव जाता जाता थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये ही घटना घडली आहे. बिहारच्या सीतामढी-दरभंगा रेल्वे विभाग गुमटी येथे मोठी दुर्घटना टळली. एक रिक्षाचालक अचानक रेल्वे रुळावर रिक्षा घेऊन पोहोचला आणि ट्रॅकवर रिक्षा चालवू लागला. याच वेळी एक ट्रेन विरुद्ध दिशेने येत होती. परंतु लोकोपायटच्या लक्षात येताच त्याने वेळेत रेल्वे थांबवली यामुळे रिक्षाचालकाचा जीव वाचला. त्यानंतर तिथे लोकांची गर्दी जमली. नंतर लक्षात आले की रिक्षाचालत मद्यधुंद अवस्थेत होता. परंतु लोकोपायलटने वेळे ट्रेन थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर लगेचच जीआरपी पोलिनांसानी देखील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. त्याच्याविरोधात कारवाई देखील करण्यात आली आहे. सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हारल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सीतामढ़ी: शराब के नशे में रेलवे ट्रैक पर ऑटो दौड़ाने लगा ड्राइवर
◆ ट्रेन चालक की सूझबूझ से बड़ा हादसा होने से टल गया
◆ यहां जिस वक्त ट्रेन आ रही थी, उसी वक्त शराब के नशे में ऑटो ड्राइवर ट्रैक पर ऑटो लेकर पहुंच गया #Bihar #Train #Railway pic.twitter.com/wZXTPghPVG
— Kaushik Kanthecha (@Kaushikdd) July 6, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Kaushikdd या अकाउंटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने दारू पिऊन सर्वांना रेल्वे ट्रॅक का आवडतात? असा प्रश्न केला आहे तर दुसऱ्या एका युजरने पण बिहारमध्ये दारूवर बंदी आहे, असे म्हटले आहे. तर अनेकांनी लोकोपायलटच्या सतर्कतेचे कौतुक केलेले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.