आजीचा भन्नाट डान्स व्हिडीओ
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी इतके विचित्र व्हिडीओ पाहायला मिळतात तर कधी मनोरंक व्हिडीओ समोर येतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता सगळ्यांसाठी टॅलेंट दाकवण्याचे एक प्लॅटफॉर्म बनले आहे. प्रत्येकजण काही ना काही नवीन कटेंट घेऊन व्हिडीओ बनवत असतो. असे व्हिडीओ अनेकदा लक्ष वेधून घेतात. तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल ही होतात.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर आपले टॅलेंट दाखवण्यासाठी काही ना काही व्हिडीओ बनवत असतात. अलीकडे वृद्ध लोकांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. कोणी आजी-आजोबा डान्स करत आहेत तर कधी आजोबा स्टंट करून दाखवत आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका आजीने मेरा जुता है जपानी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
पँट-सूट, लाल टोपी आणि शूज घालून आजीचा डान्स
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, आजी पँट-सूट, लाल टोपी आणि शूज घालून तयार झाली आहे. आजीने हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध असलेल्या राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातील ‘मेरा जुता है जपानी’ या गाण्यावर डान्स केला आहे. या गाण्याची क्रेझ लोकांमध्ये आजही दिसून येते. आजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. आजीने गाण्यांच्या बोलांवर अगदी बरोबर स्टेप्स केल्या आहेत. अनेकांनी आजीचे कौतुक केले आहे.
हे देखील वाचा – धावत्या ट्रेनसोबत सेल्फीचा नाद तरुणीला पडला महागात; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर devijamnotri या अकाऊंंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘आजी जोमात, बाकी कोमात, ‘ आणखी एका यूजरने मजेशीरपणे विचारले आहे की, – ‘आजी, हा ड्रेस दादाजींचा आहे का?’ तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘या वयात तुमच्या आयुष्याचा आनंद घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप छान मॅडम.’ इतर वापरकर्त्यांनी त्याला ‘क्यूट’ म्हटले आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पंसत केले जात आहे.