बाप रे! एक घरावरून दुसऱ्या घरावर; तरुणाने केला धोकादायक स्टंट, व्हिडीओ पाहून उडेल थरकाप
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. कधी असे व्हिडीओ समोर येतात जे पाहून मनाला आनंद मिळतो. तर कधी इतके धोकादायक व्हिडीओ पाहायला मिळतात की, जे पाहून थरकाप उडतो. अनेकदा असे व्हिडीओ बनवणारे लोक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी रील्स बनवतात. कोणी आगीसोबत स्टंट करतो, तर कोणी वेगळ्या प्रकारे बाईक चालवण्याचा प्रयत्न. अनेकदा असे स्टंट करताना हे लाक स्वत:चा जीव धोक्यात घालतात. अनेकदा इतरांचा जीव यामुळे धोक्यात येतो.
सध्या असाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचा बोल्ड आणि खतरनाक स्टंट पाहून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती एका उंच इमारतीच्या वर उभी आहे आणि तेथून दुसऱ्या इमारतीच्या छतावर उडी मारण्याच्या तयारीत आहे, हा स्टंट इतका धोकादायक होता की त्या व्यक्तीचे पाय थोडाही घसरला तर त्याला जीव गमवावा लागला असता. कोणतीही सुरक्षा उपकरणे किंवा सुरक्षा जाळी नसताना एक व्यक्ती एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीत उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ
Fearless 🥶 pic.twitter.com/1gi2yjojqd
— Crazy Moments (@Crazymoments01) May 27, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Crazymoments01 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, हा स्टंट किती धोकादायक होता, याचा अंदाज व्हिडिओ पाहूनच लावता येईल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत आणि विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. काही लोक याला साहसी म्हणत कौतुक करत आहेत, तर काहीजण याला मूर्ख आणि घातक स्टंट म्हणत आहेत जग धोक्यात आहे.
दरम्यान, दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘ही अतिशय धोकादायक आणि मूर्खपणाची चाल आहे. अशा स्टंटचा प्रचार केला जाऊ नये.’ सोशल मीडियावर काहीतरी अनोखे आणि साहसी करण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत, हे या व्हिडिओतून सिद्ध होते. तथापि, असे धोकादायक स्टंट टाळले पाहिजेत. असे स्टंट केवळ आपल्याला धोक्यात आणत नाहीत तर ते पाहणाऱ्या इतर लोकांवर देखील नकारात्मक परिणाम करू शकतात. असेही एका युजरने म्हणले आहे.