Viral video young man teasing monkey coying their actions video goes viral
सोशल मीडिया हे मनोरंजन आणि माहितीचे उत्तम साधन बनलेले आहे. सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ असे असताता की पाहून हसावे का रडावे हे कळत नाही. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात.
सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण माकडाची नक्कल करत त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. तरुण अगदी हुबेहुब नक्कल करत असून माकडे देखील घाबरलेली आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक जंगलाचा परिसर दिसत आहे. याच वेळी जंगलाच्या बाजूने असलेल्या रस्त्यावर एक माणूस माकडांसमोर त्यांनी नक्कल करताना दिसत आहे. तो माकडांसारखे उड्या मारत आहे. त्याला पाहून माकडे घाबरलेली दिसत आहेत. एक माकड त्याच्यासमोर येते, पण तरुण उड्या मारु लागताच घाबरुन झाडांमध्ये लपलेले दिसत आहे. माकड त्याच्या हल्ला देखील करायाचा प्रयत्न करत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशळ मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @mohini_shubham3744 या अकाऊंटवर शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ तु माकडांपेक्षा भारी करत आहे, तर दुसऱ्या एकाने हा तर माकडांचापण बाप निघाला असे म्हटले आहे. अनेकांनी हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत.
काही लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. लोकांनी म्हटले आहे की, व्ह्यूज आणि लाईक्ससाठी आता प्राण्यांना देखील लोक त्रास देत आहेत. अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.