जरा दमानं! धावत्या बाईकवर आजोबांचा भन्नाट डान्स ; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर कधी काय पाहायल मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच स्टंटचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कोणी बाईकवर उभे राहून चालवण्याचा स्टंट करतात, तर कोणी बाईक हवेत उडवण्याचा, तर कोणी बाईकवर डान्स करत असतो. अनेकदा यामुळे गंभीर अपघात घडले आहेत. पण तरीही लोक आपला जीव धोक्यात घालतात.
यामध्ये विशेष करुन तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी असे धोकादायक स्टंट करत असतात. तसेच काही जण केळ हिरोगिरी दाखवण्याच्या नादात असे स्टंट करतात. दरम्यान सोशल मीडियावर असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एक आजोबा स्टंट करत आहेत. आजोबा दुचाकीवर बसून डान्स करताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हायवेचा परिसर दिसत आहे. रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात गाड्यांची रहदारी सुरु आहे. याच वेळी एक आजोबा त्यांच्या काळातील बाईकवरुन जात आहेत. त्यांच्या बाईकवर मागे पुढे सामान बांधलेले दिसत आहे. याच वेळी आजोबा हात सोडून बाईक चालवत आहेत. आजोबा बाईक चालवताना डान्स करत आहेत. तसेच बाजूने एक बस चालली आहे. या दृश्याचा व्हिडिओ मागून जाणाऱ्या एका कार चालकाने रेकॉर्ड केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या वयातही एवढा जोश आहे, तर तरुपणी काय जोश असेल असे लिहिले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @jeejaji या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने आजोबा बसकडे बघून डान्स करत आहे, नक्कीच कोणाला तरी इंप्रेस करत असणार असे म्हटले आहे, दुसऱ्या एकाने, काका पाकिस्तानी आहेत, असे म्हटले आहे. आणखी एकाने आजोबा, आदळाल पुढे जाऊन असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.