viral video young man's drove mercedes in sea water stunt went wrong, video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र कधी भयावह, कधी स्टंटबाजीचे अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धसाठी, स्टंटबाजीचे, हिरोगिरीचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. विशेष करुन धोकादायक स्टंटचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामध्ये लहानांपासून तरुणांचा समावेश आहे. असे स्टंट करणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे, अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. मात्र तरीही स्टंट करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. सध्या काही तरुणांना समुद्रात गाडी घेऊन जाणे महागात पडले आहे.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओत काही तरुण महागडी मर्सडिज घेऊन समुद्रात शिरले आहे. मात्र समुद्राच्या मातीत चाकं अशी रुतून बसली आहेत की, तरुणांना बाहेर पडण्यासाठी नाकीनव आली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरुण आपला रुबाब आणि धडास दाखवण्याच्या नादात पराक्रम करुन बसले आहे. ही घटना गुजरातच्या डुमास बीचवर घडली आहे. काही तरुण पोलिसांची नजर चूकवुन समुद्रात शिरले. मात्र त्यानंतर समुद्रातील मातीत गाडीचे टायर रुतल्याने त्यांना बाहेर पडणं कठीण झाले.तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, कार अर्ध्याच्या वर पाण्यात गेली आहे.सुरक्षा आणि पर्यावरणीय कारणांमुळे डुमास बीचवर वाहने चालनवण्यास सक्त मनाई आहे. मात्र या तरुणांना हा मुर्खपणा केला असून त्यांच्या अंगलट आला आहे. कार पुर्णपणे चिखलात बुडाली आहे.
व्हायरल व्हिडिओ
સુરતના ડુમસ બીચ ઉપર મર્સીડીજ ઘૂંટણે પડી.
બહુ સમજાવ્યા છતાં ગાડીએ જિદ્દ પકડી કે, “મારે ઊંડામાં નાવું.”#Surat pic.twitter.com/z4jUE9T2PU
— Sagar Patoliya (@kathiyawadiii) July 21, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. हा व्हिडिओ एक्सवर @kathiyawadiii या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडिओची मज्जा घेत आहेत. अनेकांनी अशा मुर्ख लोकांसोबत असेच व्हायला हवे असे लोकांनी म्हटले आहे. अनेकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.