सोशल मीडिया एक मनोरंजनाचे उत्तम साधन बनले आहे. रोज काही ना काही मजेशीर, चित्र-विचित्र व्हिडिओ, भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये चिमुकल्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असे म्हणतात मुले ही देवाघरची फुले असतात. मात्र ही चिमुकली फुले अनेकदा काय बोलतील, काय प्रश्न विचारतील, काय खोड्या काढतील हे सांगता येत नाही. सध्या असाच एक मजेशीर चिमुकल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर गोंधळ घातला आहे. यामध्ये चिमुकला थेट शिक्षिकेला धमकी देत आहे.
शिक्षिकेने होमवर्क दिल्याने चिमुकल्याला राग आला आहे आणि सोबत रडूही आले आहे. यामुळे आपल्या रडक्या आवाजात चिमुकला धमकी देताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लहान मुलांचा एक वर्ग दिसत आहे. सगळी मुले अभ्यास करताना दिसत आहे, चित्र काढताना दिसत आहेत. याच वेळी एक मुलगा रडत आहे. शिक्षिकेने त्याला होमवर्क दिल्याने तो रडत आहे. तसेच रडत रडत शिक्षिकेला धमकी देत आहे. चिमुकला म्हणत आहे, माझे बाबा पोलिसात आहेत, मी तुम्हाला गोळी मारेन असे म्हणत आहे. एवढेच नव्हे तर त्याला घरात बंदूक कुठे ठेवली हेही माहिती आहे. घरातल्या पेटीत बंदूक ठेवली आहे, मी सांगतोय तुम्हाला असे चिमुकला म्हणत आहे. यावर शिक्षिका हैराण झाली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
पापा पुलिस में है होमवर्क मत दो वरना गोली मार देंगे 😂😂 pic.twitter.com/1fMcJZPWbL
— 🇮🇳Jitendra pratap singh🇮🇳 (@jpsin1) July 16, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मेजशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने या मुलाला अनेकांनी फ्युचर गॅंगस्टर, लिटिल डॉन म्हटले आहे. एका युजरने हा चिमुकला नाहीय, डॉन आहे डॉन असे म्हटसे आहे, तर दुसऱ्या एकाने डॉन को पकडना मुश्किलही नहीं नामुनकिन हैं असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने याला आताच चित्रटांसाठी साइन करा असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.