दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूल मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे आणि प्रेमाचे असे दोन तीनच नाते असतात ज्यात मैत्रीचेही नाते येते. मित्र ज्यांच्यासोबत आपण आपले सर्व सुख-दुःख शेअर करू शकतो, त्यांच्याकडे मदतीची मागणी करू शकते. बालपणापासून ते वृद्धत्वापर्यंत मैत्रीचे नाते कायम आपल्यासोबत असते. मित्रांच्या मस्तीत कधी आपलं नुकसान होईल ते सांगता येत नाही आणि अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मित्राच्या मस्तीत तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडला सोडावं लागलं अन् मग पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा. व्हिडिओत काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, चार मित्र एका स्विमिंग पूलमध्ये मजा करत असल्याचे दिसते. सर्वजण बॅचलर ट्रिपला आलेले असतात पण सर्वजण आपापल्या फोनमध्ये व्यस्त आहेत. ही गोष्ट बघून त्यातील एका मित्राने त्या सर्वांचे फोन हिसकावून घेतले आणि त्यांना एका प्लास्टिकच्या शीटमध्ये भरले. तेवढ्यात त्यातील एका फोनवर कॉल आला आणि तरुणाने हा कॉल रागातच उचलला आणि मग तो म्हणाला, “हॅलो, तुला माहिती नाही आहे का, आम्ही बॉईज ट्रिपला आलो आहोत. हा ठीक आहे नको करू, ब्रेकअप”. त्याचे हे शब्द ऐकताच त्याचर मित्र त्याला विचारू लागतात की तू लगेच गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप करून टाकला तर मित्र म्हणतो की, “हो, गर्लफ्रेंड तुझी आहे ना”. हे ऐकताच मित्र घाबरतो आणि आपला फोन घेण्यासाठी धाव घेतो पण यातही त्याचे मित्र त्याला मुद्दाम पकडून ठेवतात, ज्यामुळे त्याचा जीव आणखीनच कासाविस झाल्याचे दिसून येते. आता तरुणाचं गर्लफ्रेंडसोबत पॅचअप झालं की नाही हे स्पष्ट नाही पण ही ट्रिप मात्र त्याला आयुष्यभर लक्षात राहील.
Aise dost ho toh dushman ki zarurat hi kya🤦😂 pic.twitter.com/Z9EpB63ufD — Harry (@literallyme_0) October 2, 2025
खारुताई आणि सापाची फाईट कधी पाहिली आहे का? एकमेकांविरुद्ध भिडले अन् मग जे घडलं… मजेदार Video Viral
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @literallyme_0 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘असे मित्र असतील तर शत्रूंची काय गरज’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जेव्हा तुम्ही सिंगल असता आणि तुमच्या भावाला आनंदी पाहू शकत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मित्राच्या ब्रेकअपमध्ये जी मजा आहे ती मजा इतर कशातच नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे रे बिचारा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.