
Year Ender 2025 overnight viral faces social media fame
२०२५ वर्ष संपण्यासाठी आता केवळ दोनच दिवस बाकी राहिले आहे. सर्वजण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि २०२५ ला गुडबाय म्हणण्यासाठी तयार झाले आहे. या वर्षात जगभारत अनेक घटना घडल्या. काही घटनांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकले, तर काही घटनांनी अनेकांचे आयुष्य एका रात्रीत बदलले. सोशल मीडियावर अनेकांचे चेहरे व्हायरल झाले, त्यांना प्रचंड प्रसिद्ध मिळाली. सेलिब्रिटीसारखे त्यांचे आयुष्य बनले. यामध्ये कुंभमेळ्यातून व्हायरल झालेल्या मानोलिसापासून ते राजू कलाकारपर्यंत अशा लोकांचा समावेश आहे.
रीलचा नाद लय बेक्कार! गॅस सुरु असताना किचन ओट्यावर चढली तरुणी ; पुढं जे घडलं भयकंर, Video Viral
२०२५ मध्ये सर्वाधिक चर्चेत आलेल्या चेहऱ्यांपैकी एक म्हणजे आयआयटी बाबांचा. महाकुंभमेळ्यादरम्यान हा प्रसिद्ध झाले. याचे नाव अभय सिंग असून हा आयआयटीचा माजी विद्यार्थी होता. नंतर तो भिक्षू बनला. कुंभमेळ्यादरम्यान तो त्याच्या शांत वर्तन आणि जीवनातील दृष्टीकोनामुळे प्रसिद्ध झाला. त्याच्या भाषणांचे व्हिडिओ इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्युबवर वेगाने व्हायरल झाले.
महात्मा गांधी जी के बारे में महाकुंभ से वायरल हुए “IITian baba” के विचार!! pic.twitter.com/TcXcE8N4ki — Ankit Kumar Avasthi (@kaankit) January 17, 2025
मोनालिसा
महाकुंभ मेळ्यातून व्हायरल झालेल्या चेहऱ्यापैकी आणखी एक रुद्राक्ष विकणारी मोनालिसा, जिच्या डोळ्यांनी लोकांना भुरळ पाडली. मोनिलिसाला देखील एका रात्रीत प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. तिला मॉडेलिंगच्या ऑफर मिळत आहेत.
राजू कलाकर
राजू कलाकाहा हा च्या गायकिमुळे सोशल मीडियावर प्रचंड गाजला. त्याचे तुने दिल पे चली छुरियां गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा बनला असून मीडिया आणि प्लॅटफॉर्मस्वर त्याला आमंत्रित केले जात आहे.
गाझियाबादच्या मोदीनगर येथील रहिवाशी तान्या सिंग एका रात्रीत रॉकस्टार बहु, घुंगट वाली बहु च्या नावाने प्रसिद्ध झाली आहे. मूह दिखाई रस्समच्या वेळी तान्याने गिटार वाज वाजवून केवळ चाळीतील महिलांना नव्हे, तर देशभरातील लोकांना चकित केले होते.
धूम
उदरनिर्वाहासाठी कचरा वेचणारा मुलगा धूम २०२५ च्या अखेरीस व्हायरल झाला आहे. त्याच्या गाण्याची स्टाईल लोकांना खूप आवडली आहे. अनेकजण त्याला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.
सोशल मीडियावर सर्वात जास्त ट्रेंड झालेल्या व्यक्ती म्हणजे डॅनी पंडीत. त्याचे झटपट पटापट हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजलं. या गाण्यावर सेलिब्रिटींपासून ते सामान्यांपर्यंत अनेकांनी मजेशीर व्हिडिओ बनवले आहे. रांगोळीचे साचे दाखवणाऱ्या OG काकांची हुबेहुब नक्कल करत त्याने हे गाणे बनवले होते. आता तो या काकांसोबतही व्हिडिओ बनवतो.
लोकांच्या जीवाशी खेळ! दिल्लीच्या रस्त्यांवर खिडकीला लटकून स्टंट, हुलड्डबाजीचा प्रकार; VIDEO VIRAL