young man makes obscene remarks to a girl video goes viral
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे या सोशल मीडियामुळे अनेक गुन्ह्यांचे खुलासे होत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने भर रस्त्यात तरुणीसोबत अश्लील वर्तन केले आहे. दिल्लीच्या गुरग्राममध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
एक मॉडेल तरुणीने दावा केला आहे की, तिच्यासोबत राजीव चौकामध्ये एका तरुणाने अश्लील वर्तन केले आहे. तरुणी कॅबची वाट पाहत असताना तरुणाने तिच्यासोबत गैरवर्तन केले आहे. याचा व्हिडिओ देखील तरुणीने रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणीने व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली असून तिने संबंधित तरुणावर कारवाईची मागणी केल आहे.
तरुणी सांगत की, सकाळी ११ च्या सुमारा, तरुणी राजीव चौकात कॅबची वाट बघत होती. यावेळी एक व्यक्ती तिचा पाठलाग करत होता. तिच्याकडे बघत होता. त्यानंतर तिच्या लक्षात आले की, त्या व्यक्तीने त्याच्या पॅंटची चैन ओपन केली आहे आणि तिच्याकडे बघत आहे. तरुणाने तिच्यासमोर अश्लील वर्तन केल्याचे तरुणी सांगते. व्हिडिओमध्ये देखील हे पाहायला मिळत आहे. तरुणी सांगते की, मी सुरुवातील हे रेकॉर्ड केलेले नव्हते परंतु. तसेच तिथे आराडा-ओराडा देखील केला नाही. परंतु तिने नंतर याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. सध्या तिने हा व्हडिओ शेअर केला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @isonisinghh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी तरुणीला ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच लोकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अद्याप या व्हिडिओची पडताळणी करुन यावर कारवाई करण्यात आली आहे का नाही, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. परंतु हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावप प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर महिला युजर्सनी आम्ही घरातून बाहेर पडायचे का नाही असा प्रश्न करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हिरोगिरी नडली! तरुणाच्या ‘त्या’ कृत्यावर भडकला जंगलाचा राजा; पहा नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.